♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 40

इ 5 वी   आजचा सेतू अभ्यास दिवस 40

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


कृतिपत्रिका 24

समजून घेऊया लोकसंख्या वाढ, जमिनीतील पाण्याची पातळी

संदर्भ इयत्ता चौथी प्रकरण 24 आपण परिसर धोक्यात आणत आहोत का ? अध्ययन निष्पत्ती निरीक्षण / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (लोकसंख्या त्याची कारणे, परिणाम)

लक्षात घेऊया : लोकसंख्या वाढ

खाली दिलेल्या दोन्ही चित्रावरून असे लक्षात येते की, पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात लोकसंख्या वाढ खूप

प्रमाणात झाली आहे.

1951 साली जनगणना झाली. त्या वेळी आपल्या देशाची 36 कोटी होती. 2011 साली जनगणना झाली. त्या वेळी आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी होती.

गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली. अजूनही ती वाढत आहे. आपण ज्या वस्तू परिसरातून गरजेपोटी घेतो, त्यांची मागणी अतोनात वाढली. त्याचे नुकसान खालीलप्रमाणे झाले.

1) खेडेगावांमध्ये रोजगार मिळेनासा झाला. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले.

2) शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली लोकांना रहायला जागा मिळेवा. शहराभोवती शेती होती. मोकळ्या होत्या. तिथे नवीन वसाहती आणि रस्ते बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागली.

जागा

3) शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी खूप मोठी अंतरे पार करावी लागतात. म्हणून शहरातले लोक पाहने खरेदी करू लागले. शहरांमध्ये ही वाहने धूर ओकत फिरू लागली. शहरातल्या हवेत हा धूर मिसळू लागला. त्याचा परिणाम म्हणून शहरांमधील लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले.

4) लोकसंख्या वाढल्यामुळे कधीकधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. त्यामुळे भर वस्तीत पाणी साचते. त्यात डास वाढतात. डासांमुळे हिवताप, देंगी, हत्तीरोग, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार होती. शहरातल्या वस्तीवर लोकसंख्यावाढीचा खूप वाईट परिणाम होतो.

जमिनीतील पाण्याची पातळी

बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. 1) चित्र ग्रामीण भागातील आहे की शहरी ? (2) नदीवर लोक कोणकोणते कामे करत आहेत ?

बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) हे चित्र कसले आहे ते ओळखा आणि लिहा. 2) ह्या चित्रातून काय निष्कर्ष मिळतो ?

पाणी ही सर्व सजीवांची एक महत्वाची गरज आहे. हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. पाऊस मात्र तेवढाच पडतो. त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते. ते उपयोगी पडावे म्हणून आपण धरणे बांधून पाणी अडवू लागलो. काहीजण विहीरी खणण्याऐवजी कूपनलिका खोदू लागले. पाणी उपसण्यासाठी हातपंप वापस लागले. पंपांमध्ये सुधारणा झाली. डिझेल वापरून चालवता येईल अशा यांत्रिक पंपाचा शोध लागला. विजेवर चालणाऱ्या पंपाचाही शोध लागला. पूर्वी हे पाणी पारंपरिक पद्धतीने दिले जाई. पाणी उपसण्यासाठी रहाटगा आणि मोटेचा वापर केला जाई. आता शेतीला पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी डिझेल विजेचे पंप वापरतात. पूर्वी मोटा जितके पाणी उपसत होत्या, हे यांत्रिक पंप त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी उपसतात. याचा परिणाम म्हणून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.

सराव करूया :

प्र. 1) पुढील माहिती मिळवा व त्यापुढील प्रश्नाचे उत्तर लिहा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी