♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 39

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


कृतिपत्रिका: 23

समजून घेऊ या नैसर्गिक आपत्ती-अवकाळी पाऊस, पूर, भूकंप, त्सुनामी संदर्भ: इयत्ता चौथी प्रकरण 23 वैसर्गिक आपत्ती अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. भूकंप, पूर) लक्षात घेऊ या :

नैसर्गिक आपत्ती :

बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो. कुठे भूकंप होतो, तर कुठे पूर येतो. कुठे त्सुनामी येते, तर कुठे अवकाळी पाऊस होतो. या दुर्घटनांमध्ये अनेक माणसे जखमी होतात. काही माणसे मृत्युमुखी पडतात. लोकांची घरे पडतात. पाळीव जनावरे मरतात. काही दुर्घटनांमध्ये शेतातल्या उभ्या पिकाचा नाश होतो. मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. अशा घटनांनी घाबरून जाऊ नये. त्यापेक्षा या आपत्तींना तोंड कसे द्यावे याची माहिती घेणे फायद्याचे ठरते.

अवकाळी पाऊस :

पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळीही पाऊस पडतो अशा पावसाला ‘अवकाळी पाऊस म्हणतात. हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण या काळात पाऊस फार जोराचा झाला, तर शेतात पाणी साचते. आंब्याचा मोहोर पण या पावसामुळे गळून किंवा कुजून जातो व आंब्याचे उत्पन्न कमी होते.

पूर:

पावसाळ्यात कधी कधी तीन-चार दिवस सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात. गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शकयता असते. पुराच्या पाण्याला ओढ फार असते. पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते.

भूकंप :

जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. काही सेकंद जमीन हादरते. त्याला भूकंप म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकंप होतो, तिथली घरे हादरतात. घरातल्या वस्तू घडाघड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साफ कोसळतात. त्यांचे ढिगारे होतात. त्या ढिगायाखाली अडकून माणसे दगावतात. अनेक माणसे जखमी होतात. भूकंपाच्या केंद्राजवळ बुकसाव जास्त होते.

भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो किंवा ती जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरु नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. त्यामुळे माणसे दगावतात किंवा जखमी होतात. म्हणून भूकंप होत आहे असे लक्षात येताच खाटेखाली किंवा टेबलखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे.

त्सुनामी : tsunami

ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो, त्या वेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठया लाटा निर्माण होतात. एक-एक लाट इमारतीइतकी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किवान्यावर येऊन धडकतात. या लाटांना त्सुनामी म्हणतात. किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे त्सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात, ते त्या लाटेसमोर अगदीच हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करु शकत नाहीत.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

प्र. 1) काय करावे बरे?

अ) तुमच्या गावात पूर येणार आहे.

आ) शाळेत असताना भूकंपाचे धक्के बसत आहेत.

प्र. 2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) अवकाळी पावसामुळे शेतीचे काय आणि कसे नुकसान होते ते तुमच्या शब्दात लिहा.

आ) त्सुनामीचा किनाऱ्यावरील जनजीवनावर कोणते परिणाम होतो ?

प्र. 3) एका नैसर्गिक आपत्तीविषयी वर्तमानपत्रात आलेली बातमी मिळवा व थोडक्यात लिहा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी