♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 32

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 32

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका : 16

समजून घेऊया सूर्योदय व सूर्यास्त, लहान-मोठा दिवस 

संदर्भ : इयत्ता-चौथी, 

प्रकरण 16, दिवस व रात्र

अध्ययन निष्पत्ती : निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. दिवस व रात्र) लक्षात घेऊया :

खालील चित्रांचे निरीक्षण करा.

चित्राचे निरीक्षण केल्यावर हे उलगडले की, ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहचत नाही तेथे अंधार पडतो. तेथे रात्र आहे असे म्हणतात. सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो तेव्हा सूर्योदय होतो आणि सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळती म्हणजे सूर्यास्त होतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते. पण तो केवळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात.

चित्र पहा, निरीक्षण केल्यावर आपल्याला ही जुलै 2021 ची दिनदर्शिका आहे हे समजले असेल तर यामध्ये तुम्हाला दिनांक वार याशिवाय प्रत्येक दिनांकाच्या खाली एक लहान चित्र व काही फिकट निळ्या रंगाचे आकडे दिसले असतील. यामध्ये सुरुवातीला सूर्याचे पिवळे-लाल चित्र दिसते आणि त्याच्यापुढे आकडा दिसतो तो सूर्योदयाची घायाळी वेळ आहे; त्याच्यापुढे अजून एक सूर्याचे चित्र आहे पण ते पहिल्या चित्रापेक्षा वेगळे आहे कारण ती आहे. सूर्यास्ताची घडयाळी वेळ. सर्व दिनांकाच्या खाली सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळा पहा. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ प्रत्येक दिनांकाप्रमाणे बदलताना दिसते. या निरीक्षणातून तुम्हाला आणखी एक खात्री झाली, की दररोज दिवस सुमारे बारा तासांचा आणि रात्र बारा तासांची असे असते 

21 मार्च रोजी अचूक 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो. रात्र लहान होत जाते. ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते. त्या काळात उन्हाळा येतो. असे 21 जूनपर्यंत चालते.

21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वांत मोठा दिवस आणि सर्वात लहान असते. 21 जूनपासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे 22 सप्टेंबरपर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्यापुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो. रात्र आणखी मोठी मोठी होत राहते. असे 22 डिसेंबरपर्यंत चालते. ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते, त्या काळात हिवाळा येतो. 22. डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वांत लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. 22 डिसेंबरपासून दिवस मोठा होत जाती आणि रात्र लहान होत जाते. असे 21 मार्चपर्यंत चालते. 21 मार्चपासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होते.

वरील तारखांमध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्या.

सराव करू या :


प्र. 2) तुमच्या शब्दांत लिहा.

अ) दिवस व रात्र कशामुळे होतात?

प्र. 3) जरा डोके चालवा.

अ) अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही. त्याचे कारण काय असेल ?

आ) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात ?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठीLeave a comment