इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 32
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
कृतिपत्रिका : 16
समजून घेऊ याः उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती
संदर्भ : इयत्ता 3 री, पाठ-14. स्वयंपाकघरात जाऊया
अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.
लक्षात घेऊया :
- जे पदार्थ जळू शकतात त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात. उदा. कापूर 2. उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो, त्याला इंधन म्हणतात.
उदा. स्वयंपाकाचा गॅस,
- जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात, त्यांनाच इंधन म्हणतात. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅसचा वापरतात. हे इंधन वापरायला सोपे असते. गॅस पटकन पेटतो. त्याचा धूर होत नाही. गॅसवर स्वयंपाक करायला वेळही लागत नाही.
चुलीमध्ये लाकडाचे सरपण वापरतात. लाकडे पेटवणे जिकीरीचे काम असते. शिवाय लाकडाचा धूरपण होतो. सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात. त्यामुळे परिसराची हानी होते.

सराव करूया :
- बायोगॅस, गोबरगॅस कसा तयार करतात, याविषयी माहिती मिळावा.
- लाकूड, कोळसा इंधन म्हणून का वापरू नये ?
- अन्न शिजवण्याबरोबरच सौर ऊर्जेचा वापर आणखी कशासाठी करतात, याची माहिती मिळावा.