इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 35

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – इतिहास – भूगोल  

पहिले काही आठवूया

ताम्रयुगात चाकाचा उपयोग कसा झाला हे माहिती आहे. ताम्रयुगात गावांचा विस्तार कसा झाला हे सांगता येते.

करून पाहूयात –

नजीकच्या काळात गावातील दुकानदार किंवा व्यापारी त्याच्या व्यापाराच्या नोंदी कशा करतो याची माहिती मिळव.

नजीकच्या काळात शक्य असेल तर भाजी मंडईमध्ये लिलाय कसा होतो त्याचे निरीक्षण कर.

चाकाचे स्वरूप बदलत होते आणि त्याचा उपयोगही वाढू लागला. खासकरून मालाची जलद चाहतूक करण्यासाठी गाड्यांचा वापर होऊ लागला.

त्यामुळे व्यापार दूरवर पसरला. जलद वाहतूक, व्यापाराचा विस्तार व मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनांची केंद्रे यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आले. गावांचा विस्तार होऊ लागल्याने नगरे उदयाला आली.

वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले. सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच. सांकेतिक खुणा असलेली खापरे उत्खननात मोठ्या संख्येने मिळतात. व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यांसारख्या कारणांमुळे आधीपासून वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांमध्ये सुधारणा केल्या गेल्या. त्यांच्यावर संस्करण केले गेले. येथे संस्करण करणे


म्हणजे प्रक्रिया करणे होय. म्हणजेच सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यावर प्रक्रिया केल्या गेल्या व अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली.

व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. परंतु त्या नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषिसंस्कृतीवर आधारलेला होता. कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. आठव्या पाठात तु अभ्यासले आहे कि, शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी लोक निसर्गशक्ती आणि देवदेवतांची आराधना करू लागले, त्यातूनच अनेक घरांमध्ये अतिभव्य मंदिरे बांधली गेली. हळूहळू त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखांच्या हातात एकवटले. पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेले. आणि यातूनच जगातील एक प्राचीन नागरी संस्कृती अस्तित्वात येऊ लागली.

काय समजले ?

वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

1 नगरांचा उदय कसा झाला?

2 सांकेतिक खुणा व चिन्हांचे संस्करण का करण्यात आले?

3 प्रत्येक संस्कृतीची लिपी कशी तयार झाली?

4 शासनव्यवस्थेचे अधिकार कोणाकडे गेले?


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment