इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 35
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका : 22
समजून घेऊया: रोगप्रतिबंधक लसीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा संदर्भ: इयत्ता पाचवी प्रकरण 23 संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध
अध्ययन निष्पत्ती : स्वच्छता, आरोग्य / कचरा / आपत्ती आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण (भूमी, इंधन, जंगल, इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि मागास व वंचिताविषयी संवेदनशीलता दाखवतात.
लक्षात घेऊ याः
रोग प्रतिबंध
रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध म्हणतात. पाण्यावाटे होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. गावांतील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे निर्जंतुकीकरण ब्लीचिंग पावडरचा वापर करून केले जाते. गॅस्ट्रो किंवा काविळीसारख्या रोगांची साथ पसरली, की पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये, म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे मलेरियासारख्या रोगांच्या प्रसारास प्रतिबंध होतो. क्षयासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते. हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. रुग्णांनी वापरलेली भांडी, कपडे जंतुनाशकाने धुतले जातात. क्षयरोग्याची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते. तिच्यावर फिनाइलसारखे जंतुनाशक टाकले जाते. या उपायांनी रोगप्रसार टळतो.

हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळावे. असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असेल, तर नाक व तोंड झाकले जाईल असा ‘मास्क’वापरतात. एखादया संसर्गजन्य रोगाची लागण घरात झाली, तर त्यासंबंधीची माहिती आरोग्यखात्यास देणे हिताचे असते. असे केल्याने रोगाची लागण इतरांना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे शक्य होते.
लसीकरण
एखादया रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो शरीरात रोगजंतू शिरतात, तेव्हा आपले शरीर त्या जंतूंविरुद्ध लडा देते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. त्यामुळे बहुसंख्यवेळा शरीरात रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही. रोगप्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगाविरुध्द रोगप्रतिकार क्षमता विकसित होते.
मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षयप्रतिबंधक लस टोचण्यात येते. मूल दीड महिन्यांचे झाले, की घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंधक लसींचे तीन डोस एक एक महिन्याच्या अंतराने त्याला देण्यात येतात.

घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते. त्रिगुणी लस टोचली जाते, तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते.

साथीच्या व संसर्गजन्य रोगांस आळा बसावा, म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाजकल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी खास शिबिरे आयोजित करण्यात येतात. गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. फिरता दवाखाना, अपंग कल्याणनिधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत. आरोग्यसंस्थांमध्येही रक्त व लघवी तपासणी तसेच एक्स-रे, स्कॅनिंग, सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध आहेत. यांमुळे रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा मिळू शकते. पिण्याच्या पाण्याची, तसेच अन्नपदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायदयाने मनाई केलेली आहे. रोगप्रसार होऊ नये, हे या मनाईमागचे मुख्य कारण आहे. प्रसारमाध्यमांद्वारे आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यात येते.
सराव करु याः
- खालील रोगावर प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.
अ मलेरिया:
ब. फॉलरा:
क. पोलिओ
ड .क्षय
- पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. अ. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रोग प्रसार होत नाही.
य. लसीकरण हा रोग प्रतिबंधाचा एक उत्कृष्ट उपाय आहे.
क. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात.
- इंटरनेटच्या मदतीने तसेच घरातील मोठ्या व्यक्तींसोबत चर्चा करून कोविड 19 या रोगाची खालील मुदयाच्या आधारे
माहिती लिहा.
अ. रोगाचे नाव:
ब. रोगजंतूचेनाव:
क. प्रसाराचे माध्यम
ड. उपाय व उपचार
I
- सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छते वर आधारित दहा घोषवाक्ये तयार करा.
जसे. घरोघरी स्वच्छता, आजारातून मुक्तता.