coronavirus : IIT bombayने तयार केला डिजिटल स्टेथोस्कोप

[ad_1]

मुंबई : आयआयटी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) टीमने एक डिजिटल स्टेथोस्कोप विकसित केला आहे. या स्टेथोस्कोपद्वारे दूरवरुनच हृदयाचे ठोके ऐकू येऊ शकतील आणि ठोके रेकॉर्डही करता येणार आहेत. या उपकरणाच्या मदतीने कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना होणारा धोका कमी होण्याची शक्यता आहे. 

आयआयटी बॉम्बे टीममधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, या उपकरणाद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके, त्याची गती या संबंधीची सर्व माहिती, डेटा ब्लूटूथच्या मदतीने आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत दुरूनच पोहचतो. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांजवळ जाणं आवश्यक नाही. 

आयआयटी बॉम्बेतील या टीमने या उपकरणाचं पेटेंट मिळवलं आहे. या स्टेथोस्कोपमधून मिळणारी माहिती किंवा डेटा इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही विश्लेषण किंवा पुढील उपचारासाठी पाठवता येऊ शकतो. 

‘आयुडिवाइस’ या नावाने स्टार्टअप चालवणाऱ्या टीमने देशातील विविध रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांमध्ये अशाप्रकारचे 1000 स्टेथोस्कोप पाठवले आहेत. रिलायन्स हॉस्पिटल आणि पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या क्लिनिकल माहितीच्या मदतीने हे डिव्हाइस विकसित केलं गेलं आहे.

कोरोना माहामारीमध्ये या उपकरणाची मदत होऊ शकते –

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आता आरोग्य कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात येताना आढळत आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो. डॉक्टर हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी स्टेथोस्कोपचा वापर करतात. त्यामुळे रुग्णांवर उपचार करता करता अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब ठरतेय. त्यामुळे रुग्णांच्या जवळ न जाता अशाप्रकारचा स्टेथोस्कोप वापरला गेल्यास, डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे हे उपकरण कोरोनामध्ये फायदेशीर ठरु शकतं.

या टीममधील सदस्याने डिजिटल स्टेथोस्कोपबाबत माहिती देताना सांगितलं की, कानात लावण्यात येणारे दोन उपकरण एका ट्यूबशी जोडलेले असतात. या ट्यूबमुळे रोगाचा शोध घेण्यास अडथळा आणू शकणारा आवाज काढून टाकतो आणि शरीरातील आवाज पाठवतो. याचा दुसरा फायदा म्हणजे स्टेथोस्कोप विविध आवाजांना फिल्टर करुन त्याला इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये रूपांतरित करण्यास सक्षम आहे. याबाबत स्मार्टफोन किंवा लॉपटॉपवर फोनोकार्डियोग्रामच्या रुपात पाहता येऊ शकतं. 



[ad_2]

Source link

Leave a comment