xiaomi mi a3 : शाओमीच्या या फोनमध्ये चुकूनही अपडेट करू नका – xiaomi mi a3 starts receiving stable android 10 for the third time

[ad_1]

नवी दिल्लीः जर तुमच्याकडे चीनची कंपनी शाओमीचा प्रसिद्ध स्मार्टफोन Mi A3 स्मार्टफोन असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अपडेट करण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला थोडे थांबावे लागेल. कारण, कंपनीने या फोनसाठी जारी करण्यात आलेले अँड्रॉयड १० अपडेट करणे थांबवले आहे. या फोनमध्ये बग्स येत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. शाओमीने हे तिसऱ्यांदा केले आहे.

वाचाः
‘करोना’ला रोखण्यासाठी भारताचे ‘ब्रह्मास्त्र’ तयार

शाओमीने पहिल्यांदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात Mi A3 साठी अँड्रॉयड १० अपडेट केले होते. ज्यात बग आल्याने हे अपडेट परत घ्यावे लागले होते. त्यानंतर कंपनीने मार्च मध्ये अपडेट जारी केले होते. ते अपडेटही कंपनीला मागे घ्यावे लागले. आता ८ एप्रिल पुन्हा तिसऱ्यांदा अपडेट जारी केले होते. परंतु, बग आल्याने कंपनीने पुन्हा एकदा हे अपडेट परत घेतले आहे. शाओमी Mi A3 कंपनीचा तिसरा अँड्रॉयड वन स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये सॉफ्टवेअरवरून नेहमीच कंपनीवर टीका झाली आहे. कंपनीने अँड्रॉयड वन प्रोग्राम अंतर्गत MIUI च्या जागी स्टॉक अँड्रॉयड सॉफ्टवेअर दिले होते. त्यामुळे याला वेळोवेळी अपडेट आणि महिन्याला सिक्युरिटी पॅच मिळत होते. परंतु, असे होत नाही. कंपनीने आता पर्यंत या डिव्हाईसला बग्स फ्री अँड्रॉयड १० अपडेट मिळाले नाही. तर अँड्रॉयड डिव्हाईसला सर्वत आधी हे अपडेट मिळायला पाहिजे होते. कंपनीचा हा फोन आता पर्यंत अँड्रॉयड ९ वर काम करीत आहे.

वाचाः
सर्वात स्वस्त iPhone १५ एप्रिलला लाँच होणार

या फोनच्या अनेक युजर्संना सॉफ्टवेअर संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या अँड्रॉयड १० शी संबंधित अपडेट करणे टाळणे हे फायदेशीर आहे. अँड्रॉयड ९ चा वापर करणे फोनसाठी सुरक्षित आहे.


वाचाः

फॅक्ट चेकः रतन टाटा यांच्या नावाने फेक मेसेज



[ad_2]

Source link

Leave a comment