Corona virus संबंधी आपल्या मनातील प्रश्न व त्याची उत्तरे


मित्रांनो Corona व्हायरस  बद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत . नेमका हा आजार कशामुळे होतो कशामुळे होत नाही. काय उपाय करायला हवेत ? यावर औषध उपलब्ध आहे का ? कोणती काळजी घ्यायला हवी? हा आजार कोणत्या व्यक्तींना होऊ शकतो? या व यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या पोस्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच आपले समाधान यातून होईल. 


प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?

उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴

प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?

उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2). novel म्हणजे नवीन.
या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.

प्रश्न 3. Corona याचा उगम (origin) कुठे झाला?

उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.

प्रश्न 4.Corona हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?

उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).


प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात Corona हा विषाणू जिवंत राहील का?

उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.

प्रश्न 6. Corona हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?

उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.

प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांनाCorona हा आजार होत नाही का?

उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.

प्रश्न 8. मांसाहार करणार्‍या व्यक्तींना Corona हा आजार होतो का?

उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)

प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?

उत्तर = 1. ताप
2. सर्दी
3. श्वास घेताना अडचण होणे
4. थकवा
5. कोरडा खोकला


प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?

उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.

प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?

उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.

प्रश्न 12. हा आजार कसा पसरतो?

उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्‍या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.

प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?

उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0) हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.

प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?

उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.


प्रश्न 15. Corona हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?

उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे
1. हवा = 3 तास
2. तांबे = 4 तास
3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस
4. स्टील = 2 ते 3 दिवस
5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस

प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?

उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब्ध होण्यास किमान एक ते दीड वर्ष लागू शकतात. हा विषाणू स्वतःचा आकार बदलू शकतो(Mutation) म्हणून लस शोधणे अवघड आणि किचकट काम आहे. आणि आत्तापर्यंत तरी कोणतेच औषध यावर नाही.

प्रश्न 17. गोमूत्र,लसूण,काळी मिरची,लवंग काम करते का ?

उत्तर. वरील वस्तू या आरोग्यासाठी हितकर असतात.पण यापैकी कोणतीच वस्तू कोरोना विषाणूला मारत नाही. यावर कोणतेच संशोधन झाले नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.

प्रश्न 18.Social Distancing म्हणजे काय?याचा काय उपयोग ?

उत्तर = Social distancing (सामाजिक अंतरता) म्हणजे एकमेकांपासून किमान 5 ते 6 फूट अंतरावर राहणे जेणेकरून आपण आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपण जर आजारी असलात तर इतरांना संक्रमित करणार नाहीत.
जर असे आपण किमान 2 ते 3 हफ्ते केलात(जे इटलीने किंवा चीनने केले नाही) तर आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो(Flattening the curve) व आपल्या दवाखान्यातील क्षमता अगोदरच कमी आहे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था देखील सुरळीत राहील.

प्रश्न 19.Corona पासून मी कसे सुरक्षित राहू ? प्रतिबंध काय ?

उत्तर. = तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी खालील प्रतिबंध करू शकता

1.वारंवार हात धुणे.(किमान 30 सेकंद) दर 2 ते 3 तास.
बाहेरून आल्यास सर्वात अगोदर हात-पाय धुवा.
2.तोंडाला,नाकाला,डोळ्याला न धुतलेले हात न लावणे
3.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
4. अनोळखी व्यक्तिंपासून सुरक्षित अंतर बाळगा.
5. खोकलनाऱ्या,शिकणाऱ्या व्यक्तींपासून दुर रहा.
6. वारंवार वापरातल्या वस्तूंना स्वच्छ पुसून घ्या.


प्रश्न 20. हात कशाने व कसे धुवावेत ?

उत्तर = हात साबणाने किंवा हॅण्डवॉशने स्वच्छ धुवावेत. किमान 30 सेकंद तरी हात धुवावेत (100 % रोगाणू मरतात).हात धुण्याची वैज्ञानिक पद्धत खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

https://youtu.be/IisgnbMfKvI

प्रश्न 21. फेस मास्क वापरावेत का ?

उत्तर = योग्य पद्धतीने वापरले तर काहीच हरकत नाही. पण नाक किंवा तोंड कुठून उघडे आहे का ? याची काळजी घ्यावी. रुमाल देखील चालतो पण तो रोज किमान दोनदा धुवा.

प्रश्न 22. प्रवास करावा की नाही ?

उत्तर = नाही अजिबात नाही…………कितीही अडचण असेल (दवाखाना व्यतिरिक्त) तरी प्रवास टाळा. आपण स्वतः तर बळी पडताल आणि सोबत इतरांना देखील घेऊन जाताल.

प्रश्न 23. जनता कर्फ्यु ने खरंच कोरोना व्हायरस मरेल का ?

उत्तर = काही प्रमाणात. पण जेंव्हा लोकं एकत्र येतील तेंव्हा हा पुन्हा वाढेल म्हणून आपले सर्वच कामे (जिवापेक्षा कमीच महत्वाची) टाळावी.उगाच मला काही होणार नाही म्हणून बाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कृपा करून सरकारला त्यांचे काम करुद्या.

प्रश्न 24. खरा कर्फ्यु लागण्याच्या अगोदर सर्व आवश्यक वस्तू जमा कराव्यात का ?

उत्तर = नाही. कितीही झाले तरी आवश्यक दुकानं बंद होणार नाहीत(उदा. किराणा,मेडिकल,दवाखाना).म्हणून उगीच घाई करू नका आणि वस्तूंची जमवा जमवी करू नये.

🙏🙏 लक्षात ठेवा : प्रतिबंध हाच उपाय 🙏🙏

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

उपयुक्त माहिती आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करा

आपल्याला हे देखील आवडेल

 

 

उपयुक्त माहिती मित्रांसोबत शेअर करा.

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter

Leave a comment