विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा व त्यामध्ये दाखवलेले 1 to 10 numbers वाचन करावे व 1 to 10 spelling आपल्या वहीत लिहावे
Uncategorised
Urban Outcomes Framework सर्व्हे माहिती अशी भरा.
Urban Outcomes Framework
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात सहभागी होऊया आणि आपल्या शहराचा नावलौकिक वाढवूया
सर्वेक्षण कसे भरायचे?
१) लिंकवर क्लिक करा-
https://eol2022.org/CitizenFeedback
२) भाषा निवडा
3) वैयक्तिक तपशील भरा


व्यवसाय निवडा
वरील यादी प्रमाणे आपला जो व्यवसाय असेल तो निवडा

यानंतर आपण किती वर्षाचे आहात ते खालील बॉक्समध्ये टाईप करण्याचा ऑप्शन येईल त्यामध्ये आपले वय टाईप करा

यानंतर आपले शिक्षण निवडण्याचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा





6) एकदा तपशील भरल्यानंतर, Proceed वर क्लिक करा.
7) पुढील पानावर, तुम्हाला 17 पर्यायी प्रश्नांची (MCQ) उत्तरे देउन तुमचा फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.
यानंतर im not robot या असणाऱ्या बॉक्स वर क्लिक करा व सबमिट बटनावर क्लिक करा
8) एकदा सर्वेक्षण सबमिट केल्यानंतर, क्लिक करा
आणि प्रमाणपत्र डाउनलोड करा.
9) डाउनलोड केलेले प्रमाणपत्र आपल्या व्हॉटसॅप ग्रुपवर पाठवा.
10)आपल्या कडील छापील फॉर्म भरल्याची पावती वर्गशिक्षकांकडे जमा करा.
11)डिजिटल प्रमाणपत्र आणि सदर पावती यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणासाठी तुह्मी वेळ काढल्याबद्दल आणि तुमचा बहुमोल अभिप्राय शेअर केल्याबद्दल आह्मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. या सर्वेक्षणाची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
खोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचं खरं काम वेगळंच आहे!
खोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचं खरं काम वेगळंच आहे!
लहान असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे खोडरबर वापरत असतो. खोडरबरचा सामान्यता उपयोग पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी होतो. परंतु लाल आणि निळा रंगाचा खोडरबर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वापरला असेल.
. पांढरा खोडरबर हा पेन्सिल लिहिलेले खोडण्यासाठी असतो असा आपला सामान्यता समज आहे. त्यामुळे असा लाल किंवा निळा बरोबर आपल्या समोर आला की आपल्याला असे वाटते की हा निळा खोडरबर म्हणजे पेन ने लिहिलेले खोडण्यासाठी आहे.
पण खरं सांगायचं तर हा आपला गैरसमज होता. काही जण अजूनही असं मानतात की या खोडरबरने पेनाची शाई खोडता येते.
मुळात त्यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा, कारण या या लाल-निळ्या खोडरबरच्या लाल भागावर पेन्सिलची आकृती दिसते, त्यामुळे त्याचा वापर पेन्सिलने लिहिलेलं खोडण्यासाठी होतो हे बरोबर.
आणि या खोडरबरच्या निळ्या भागावार मात्र पेनासारखी आकृती दिसते त्यामुळे आपण असा समज करून घेतो की हा भाग पेनाने लिहिलेलं खोडण्यासाठी आहे की काय?
हा समज प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोच आणि त्या पायी पेनाची शाई खोडताना कागद मात्र फाटला जातो आणि आपल्या लक्षात येतं की आपला समज हा एक गैरसमज होता.

चला तर जाणून घेऊया या निळ्या भागाचा नेमका वापर काय?
या निळ्या भागाचा वापर केवळ पेन्सिलच्या माध्यमातून कागदावर उमटलेले गडद लिखाण किंवा लिहिताना झालेली एखादी चूक/खुण खोडण्यासाठीच केला जातो. म्हणजे या खोडरबरचा वापर हा फक्त पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठीच होतो, पेनाचे नाही हे लक्षात घ्या.
मग तुम्ही म्हणाल दोन रंग देण्याचा काय फायदा? तर या दोन रंगातील फरक असा आहे की
लाल भागाचा वापर हा पातळ कागदावरील पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठी होतो आणि
निळ्या भागाचा वापर जाड कागदावरील पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठी होतो.
जर तुम्ही पातळ कागदावरील लिखाण खोडण्यासाठी निळ्या भागाचा वापर केला तर ज्या ठिकाणी तुम्ही खोडण्याचा प्रयत्न करत आहात तो कागदाचा भाग फाटू शकतो. विश्वास नसेल तर एकदा ट्राय करून बघा.
याच विरुद्ध जर तुम्ही एखाद्या जाड कागदावर/ आर्ट पेपरवर लाल भागाचा वापर खोडण्यासाठी केला तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जे लिखाण तुम्ही खोडू इच्छिता आहात ते सहसा मिटणार नाही. याच ऐवजी जर तुम्ही निळ्या भागाचा वापर केला तर मात्र ते लिखाण सहज खोडले जाईल.
काय? मिळाली का नाही छान माहिती? आणि दूर झाला की नाही गैरसमज? मग आता हा लेख शक्य तितका शेअर करा इतरांचाही या लाल-निळ्या खोडरबरच्या बाबतीतला गैरसमज दूर करण्यास मदत करा.

सदर ग्रुप मध्ये खालील इयत्ता शिकवणाऱ्याच शिक्षकांनी जॉईन व्हावे. या ग्रुप मध्ये इयत्तेला, विद्यार्थ्यांना आवश्यक अशा उपयुक्त
- ✅शैक्षणिक साहित्य
- ✅घरचा अभ्यास
- ✅ऑनलाइन टेस्ट
- ✅निबंध
- ✅गोष्टी, बोधकथा
- ✅मनोरंजक अभ्यास
- ✅सामान्य ज्ञान टेस्ट
- ✅भाषणे
यासारखा कंटेंट शेअर केला जाणार आहे.
जॉईन होण्यासाठी खालील इयत्ते समोरील येथे क्लिक करा वर क्लिक करा.
इयत्ता | ग्रुप जॉईन करण्यासाठी |
इयत्ता १ ली | येथे क्लिक करा |
इयत्ता २ री | येथे क्लिक करा |
इयत्ता ३ री | येथे क्लिक करा |
इयत्ता ४ थी | येथे क्लिक करा |
इयत्ता ५ वी | येथे क्लिक करा |
इयत्ता ६ वी | येथे क्लिक करा |
इयत्ता ७ वी | येथे क्लिक करा |
इयत्ता ८ वी | येथे क्लिक करा |
इयत्ता ९ वी | येथे क्लिक करा |
इयत्ता १० वी | येथे क्लिक करा |
जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य pdf
जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य pdf संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी ३ डिसेंबर रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन‘ पाळण्यात येतो. या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघाने यावर्षी ‘सर्वांसाठी शाश्वत आणि संवेदनक्षम समाजाकरिता परिवर्तन’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे.

हक्क देऊ,संधी देऊ, दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ.
दिव्यांगांना देऊ संधी,
वाहील विकासाची नांदी.
सर्वांचा निर्धार,
दिव्यांगांचा स्विकार.
समाजाला जागवू या,
दिव्यांगांना सक्षम बनवूया.
आजचा घरचा अभ्यास इयत्ता पहिली 16-11-2022
आजचा घरचा अभ्यास इयत्ता पहिली 16-11-2022
विषय- मराठी
खालील शब्द पहा व सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा.
विषय गणित Maths
1 to 10 numbers लिहा. व पाठ करा.
विषय – इंग्रजी English
खालील प्राण्यांची नावे लिहा व स्पेलिंग पाठ करा
आजचा घरचा अभ्यास इयत्ता पहिली 15-11-2022
आजचा घरचा अभ्यास इयत्ता पहिली
विषय- मराठी
खालील वाक्ये पहा व सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा.
विषय गणित Maths
1 to 100 numbers लिहा. व पाठ करा.
विषय – इंग्रजी English
खालील वारांची नावे लिहा व स्पेलिंग पाठ करा
खालील व्हिडिओ पहा
आजचा घरचा अभ्यास इयत्ता पहिली
आजचा घरचा अभ्यास इयत्ता पहिली
विषय- मराठी
खालील शब्द पहा व सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा.
विषय गणित Maths
2 to 10 पाढे चौकटीवहीत लिहा.व पाठ करा.
विषय – इंग्रजी English
खालील नावे इंग्रजी व मराठी मध्ये लिहा व स्पेलिंग पाठ करा
Student Portal मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणेबाबत नवीन माहिती
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ई-गव्हर्नन्स अंतर्गत N.I.C. पुणे यांचेकडून विकसित करण्यात आलेल्या student portal मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद घेणे अनिवार्य आहे. याबाबत उपरोक्त संदर्भ क्र. 1. 2,3 व 4 च्या पत्रान्वये आपणास कळविण्यात आले होते. तसेच वेळोवेळी VC द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये देखील विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमधील माहिती त्यांच्या आधार क्रमांकानुसार नोंदविण्याच्या/अद्यावत करावयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. परंतु अद्याप याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद घेणे अद्याप बाकी असून ज्या काही विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्यामध्येही बऱ्याच प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत.
सदर प्रकरणी संदर्भ क्र. 4 नुसार मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27/09/2022 रोजी online बैठक घेण्यात आलेली असून मा. संचालक महोदयांनी खालील प्रमाणे उपाय योजना राबवून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी / दुरुस्ती दिनांक 30/10/2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहे.
(अ) आधार नोंदणी करणेबाबत
(१) मा. जिल्हाधिकारी यांना विनंती करून त्यांचेकडून प्रत्येक तालुक्यास किमान २ आधार किट ऑपरेटरसह उपलब्ध करून घ्यावे. तसेच आधार कॅम्पस देखील आयोजित करावेत.
(२) शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग आणि student पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांचे नमूद केलेले नाव जन्म तारीख व लिंग हे आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत असल्याची खात्री करावी. जिथे आधार अपडेट करावयाचे विद्यार्थी जास्त आहेत तेथे गटशिक्षणाधिकारी यांनी Operators च्या कामाचे नियोजन करावे. आपल्या जिल्ह्यातील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आढावा बैठकीतून सरल पोर्टलवर आधार अपडेटसाठी शाळेंच्या स्तरावर मुख्याध्यापक यांना सूचना व मार्गदर्शन देण्याबाबत विनंती करावी.
(३) आधारची माहिती offline bulk मध्ये नोंदवून नंतर Online नोंदविण्यापेक्षा विद्यार्थीनिहाय स्वतंत्रपणे नोंदवावी की ज्यामुळे आधार नोंदणीची पुनरावृत्ती होणार नाही.
(४) ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढले गेलेले नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यास अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात यावी.
(५) सदर कामी आपलेकडील एम आय एस कॉर्डीनेटर, डाटा ऑपरेटर, विषयतज्ञ साधन व्यक्ती, विषयतज्ञ डाटा ऑपरेटर, फिरते विशेष शिक्षक यांना प्रत्येकी किमान १०० विद्यार्थीची जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या सर्वांचे शाळा भेटीच्या वेळापत्रकाचे नियोजन करून नियोजित शाळेंच्या मुख्याध्यापकांचे युजर आयडी व पासवर्ड घेऊन आधार नोंदणीच्या कामास सुरूवात करावी व त्यांचे कामावर नियंत्रण व पर्यवेक्षण करण्याचे काम संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांचेकडे सोपविण्यात यावे. तसेच त्यांनी देखील स्वतः शाळा भेटी देण्याचे नियोजन करावे. त्यांचे नियोजन शिक्षणाधिकारी यांनी नियंत्रण करावे.
(६) या कामाच्या प्रगतीचा आपण आढावा घेऊन दर सोमवारी त्याचा अहवाल संचालनालयास न चुकता सादर करावा.
(ब) आधार क्रमांकाच्या दुरूस्ती करणेबाबत
(१) शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे student पोर्टल मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत नसल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून तातडीची दुरुस्ती करावी. आधार कॅम्पस मध्ये याबाबत जागरूकतेने कार्यवाही करावी.
(२) आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास आधार कैम्पसची मदत घेण्यात यावी. दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाचा तपशील student पोर्टल मध्ये अद्यावत करण्यात यावा.
(३) Student पोर्टल मध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नमूद केले नसल्याची खात्री कारवी. अशा प्रकारे संपूर्ण कामाचा निपटारा दिनांक-३०/१०/२०२२ पर्यंत १००% पूर्ण करावा.
सदर आदेश PDF स्वरुपात
*संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र प्रश्नपत्रिका इयत्ता 1 ली ते ८ वी*
*पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध*
*सर्व विषयासहित*
तसेच खालील लिंकवर आपल्या इयत्तेच्या *आकारिक नोंदी* सुद्धा उपलब्ध आहेत
📝 *इयत्ता पहिली*
📝 *इयत्ता दुसरी*
📝 *इयत्ता तिसरी*
📝 *इयत्ता चौथी*
📝 *इयत्ता पाचवी*
📝 *इयत्ता सहावी*
📝 *इयत्ता सातवी*
📝 *इयत्ता आठवी*
इयत्ता पहिली पेपर संकलित मूल्यमापन -1| 1 st sankalit mulyamapan paper Sem 1
iyatta dusari paper,इयत्ता पहिली पेपर, iyatta dusari sankalit mulyamapan paper इयत्ता पहिली पेपर संकलित मूल्यमापन -1 pdf download करण्यासाठी दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी
10 वी राज्यशास्त्र ऑनलाईन टेस्ट
१ | संविधानाची वाटचाल | येथे क्लिक करा |
२ | निवडणूक प्रक्रिया | येथे क्लिक करा |
३ | राजकीय पक्ष | येथे क्लिक करा |
४ | सामाजिक व राजकीय चळवळी | येथे क्लिक करा |
५ | भारतीय लोकशाही समोरील आव्हाने | येथे क्लिक करा |