[ad_1]
गुगल नेस्ट मिनी नोव्हेंबर २०१९ मध्ये लाँच करण्यात आला होता. याची सुरुवातीची किंमत ४ हजार ४९९ रुपये होती. फ्लिपकार्टवर याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. गुगल नेस्ट हबची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर याची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये दोन्ही प्रोडक्ट आकर्षक ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते. बीएसएनएलचे जे ग्राहक ७९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्लानच्या वार्षिक सब्सक्रिप्शन घेतील. त्या युजर्संना या ऑफर्सचा फायदा मिळणार आहे. सेकंड जनरेशन स्मार्ट स्पीकर गुगल नेस्ट मिनी खरेदी करायचे असल्यास युजर्संना १२८७ रुपयांचा वन टाइम युसेज चार्ज द्यावा लागणार आहे.
जर या ऑफरमध्ये गुगल नेस्ट हब घ्यायचा विचार असेल तर तुम्हाला २ हजार ५७८ रुपयांचा वन टाइम पेमेंट करावा लागणार आहे. गुगल नेस्ट हब स्मार्ट डिस्प्लेचा स्पीकर आहे. जो ७ इंचाचा टचस्क्रीन पॅनेल, फ्रंट मध्ये EQ Light सेन्सर, दोन फार फील्ड मायक्रोफोन आणि एक फुल रेंज बॅक स्पीकर देण्यात आला आहे. बीएसएनएल डीएसएल किंवा भारत फायबर कस्टमर कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर अडवॉन्स पेमेंट केल्यानंतर वार्षिक सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. ही ऑफर सध्या चेन्नई सर्कलमधील बीएसएनएलच्या सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध आहे.
६ कॅमेऱ्याचा नोकियाचा फोन १५००० ₹ स्वस्त
‘गेमिंग ऑन डिमांड’: ‘हे’ गेम्स कधीही-कुठंही खेळा
[ad_2]
Source link