Working Days of Government workers
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा Working Days लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जाहीर केल्यानंतर आता त्याच्या नियमांचा जीआर (शासन निर्णय) २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. त्यात पाच दिवसांचा आठवडा Working Days कोणास लागू नसेल हे तर स्पष्ट केलेले आहेच, शिवाय पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित करण्यात आली आहे.new Working Days Rule
नियम Working days rule
१. दिनांक २९ फेब्रुवारी, २०२० पासू शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.
२. सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील.
३. तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी राहील.
४. या कायालयीन वेळेमध्ये दिनांक ४ जून, २०१९ च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी १.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असेल.
५. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत.
अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने दिली आहे. या यादीत दिलेल्या प्रकरात मोडणाऱ्या इतर कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.
एखाद्याचे whatsapp status video download करा कोणत्याही App शिवाय
तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का ? १ मिनिटात चेक करा.
खूशखबर ! आता सिमकार्डच बनणार मेमरीकार्ड
सावधान ! ‘या’ 5 चुका केल्या जप्त होईल तुमचं ‘DL’, होईल मोठा दंड देखील, जाणून घ्या
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook