[ad_1]
नोकियाचा Nokia 9 Pureview आता वेबसाइटवर केवळ ३४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत तब्बल १५ हजार रुपयांची कपात केली आहे. नोकियाने हा फोन गेल्यावर्षी जुलै महिन्यात भारतात लाँच केला होता. यानंतर पहिल्यांदा नोकियाने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. नोकियाने कमी केलेली किंमत ही तात्पुरती आहे की, कायमस्वरूपी आहे. याविषयी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. काही क्रेडिट कार्ड्सवर हा फोन ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय सह देण्यात आला आहे.
Nokia 9 Pureview ची खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंचाचा क्वॉड एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये बॅकला पेंटा कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ५ कॅमेरे दिले आहेत. हे सर्व कॅमेरे १२-१२ मेगापिक्सलचे आहेत. या पाच कॅमेऱ्यांपैकी ३ कॅमेरे मोनोक्रोम सेन्सर आणि २ आरजीबी सेन्सर आहेत. कोणताही पिक्चर कॅप्चर करण्यासाठी फोनमध्ये सर्व सेन्सर एकत्र काम करतात. सेल्फी प्रेमींसाठी फोनमध्ये फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास ५ देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये क्यूआय वायरलेल चार्जिंग सपोर्ट सह ३, ३२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
फोटोः ‘हे’ स्मार्ट गेम्स कधीही-कुठंही खेळा
जिओचे कमी किंमतीतील दोन नवे प्लान लाँच
[ad_2]
Source link