बलिप्रतिपदा का साजरी केली जाते ? कथेसह संपूर्ण माहिती balipratipada in marathi

बलिप्रतिपदा का साजरी केली जाते ? कथेसह संपूर्ण माहिती

बलिप्रतिपदा मित्रांनो दिवाळीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा .balipratipada in marathi ही बलिप्रतिपदा नक्की का साजरी केली जाते ? diwali balipratipada तिचे महत्त्व काय आहे ? बलिप्रतिपदा म्हणजे काय ? आणि ती कशी साजरी करावी अगदी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

  बलिप्रतिपदा सणाचे महत्व 

     अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावं याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्रीविष्णूंनी पाताळात धाडले. तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा याच दिवशी उत्तर भारतात आणि मध्य भारतात नवीन विक्रम संवताचा ची सुरुवात होते आपल्या महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेरच्या व सासरच्या पुरुष मंडळींना ओवाळतात .

       घरोघरी सकाळी किंवा सायंकाळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली जाते. पत्नी पतीला औक्षण करते. आणि पती-पत्नीला ओवाळणी घालतो. जे नवविवाहित दाम्पत्य असतात त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी होते.

यालाच दिवाळसण असेही म्हणतात.त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या अनेक भागात दिसून येते.

    उत्तर भारतात या दिवशी गोवर्धनपूजा असते भगवान श्रीकृष्णाच्या किंवा भगवान श्रीविष्णु च्या देवळात ही पूजा संपन्न होते या दिवशी भगवान श्री विष्णूंना अनेक पक्वान्नांचा किंवा मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो आणि म्हणूनच या सणाला अन्नकूट या नावाने सुद्धा ओळखले जाते .

      दिवाळीतला पाडवा हा वर्षभरातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त . आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात मानतात .लक्ष्मी पूजन करून नवीन वर्षाचा प्रारंभ व्यापार्‍यांच्या दृष्टीने हा मानला जातो .

      त्यांच्या जमाखर्चाच्या किंवा कीर्द खतावणीच्या नवीन वह्या या दिवशीच सुरू होतात नवीन वर्षांची सुरुवात करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू अक्षता फुले गंध इत्यादी वाहिला जातो त्यांची पूजा होते .

  बलिप्रतिपदा कोणत्या महिन्यात येते ? 

     कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा  .भगवान श्रीविष्णु ही तिथी बळीराजाच्या नावाने केली आणि म्हणूनच या तिथीला बलीप्रतिपदा diwali balipratipada असंही म्हटलं जातं .खरं तर बळीराजा हा अत्यंत दानशूर होता .दारी येणारा अतिथि जे मागेल ते दान तो त्याला देत असे . दान देणे हा गुण आहे पण गुणांचा अतिरेक सुद्धा दोषच असतो .

     कोणाला काय द्यावं किती द्या व कोठे द्यावं केव्हा द्यावं याचा एक निश्चित विचार आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे दान देताना ते सत्पात्री त्यावर अपात्री देऊ नये कारण अपात्र माणसांच्या हाती जेव्हा संपत्ती लागते तेव्हा हा माणूस मदोन्मक्त होतो आणि मनाला वाटेल तसे वागू लागतो .अधार्मिक कृत्य करू लागतो .

  बलिप्रतिपदा कथा 

     बळीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे तेव्हा भगवान श्री विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला बटूअवतार घेतला आणि या वामनाने बळीराजाला कडे जाऊन भिक्षा मागितली तेव्हा बळीराजाने काय हवं म्हणून विचारलं वामनाने त्रिपाद भूमी दान मागितले .त्रिपाद भूमी म्हणजे तीन पाऊले इतकी भूमी इतकी जमीन मागितली . 

वामन कोण आहे आणि हे दान नक्की का मागत आहे ? अशा दानामुळे नक्की काय होणार आहे  ? याचं ज्ञान बळीराजा असल्याने बळीराजाने त्रिपाद भूमि या वामनाला देण्याचं मान्य केलं . 

   त्याबरोबर बामनाने आपले विराट रूप धारण केलं आणि एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली .तर दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले, आणि आता तिसरे पाउल कुठे ठेऊ ?  असे त्याने बळीराजाला विचारलं तेव्हा राजा म्हणाला तिसरे  पाऊल  आपण माझ्या मस्तकावर ठेवा असे बळीराजाने सांगितले .  वामनाने . तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून   बळीराजाला  पाताळात धाडले. 

     आणि  धाडण्यापूर्वी बळी राजाने वर सुद्धा मागितला  वामनाने वर सुद्धा दिला की तुझी काही इच्छा असेल तर काही वर तू मागू शकतो तेव्हा   बळी राजाने  असा वर मागितला कि आता पृथ्वीवरील माझं संपूर्ण राज्य संपणार आहे आपण मला पाताळात घालवणार आहात तेव्हा तीन पावलं टाकण्याचा हे जे काही घडलं ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखलं जावं 

    यमदीप करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत त्याला अपमृत्यू अकाली मृत्यू येऊ नये .त्याच्या घरी माता लक्ष्मी चा निरंतर वास असावा आणि मित्रांनो हेच ते तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसांना बळीच राज्य असं म्हटलं जातं .

  बलिप्रतिपदा पूजा कशा पद्धतीने केली जाते ? 

    बलिप्रतिपदेला बळीची पूजा नक्की कशी करतात ? बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळी काढली जाते या रांगोळी मध्ये बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करण्याची प्रथा पर या ठिकाणी आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आदित्य दीपदान तसेच वस्त्र दान केलं जातं बळीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा आयुष्य अर्पण होऊन दैत्य राजा संतुष्ट होतो अशी धारणा आहे .

   दीपदान केल्याने व्यक्तीला दैत्य  यांच्या उपद्रव यापासून अभयदान प्राप्त होतं . आणि जेव्हा आपण वस्त्रांचा दान बळीराजाला करतो तर हे वस्त्र दान केल्यामुळे वस्त्र दान करणार्‍या व्यक्ती वर बळी ची कृपा होऊन त्या व्यक्तीच्या घरात भरभराट  राहते माता लक्ष्मी अशा घरात  स्थायी वास करते  .अशी हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे . 

आपणास हे देखील आवडेल 

वसुबारस का साजरी करतात 

यमदीपदान माहिती

धनत्रयोदशी का साजरी करतात ? 

     तर मित्रांनो बलिप्रतिपदा balipratipada  विषयीची ही माहिती आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कळवा व  या माहितीची , वेबसाईटची  लिंकआपल्या इतर सहकाऱ्यांना मित्रांना अवश्य शेअर करा .

Leave a comment