[ad_1]
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. सध्या व्हिडीओ कॉलचं प्रमाण वाढलं असून यासाठी वेगवेगळ्या एप्सची मदत घेतली जात आहे. पण सर्वांच्याच मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सएपने यासाठी आपली सुविधा अपग्रेड केली आहे. व्हॉट्सएपने वॉईस कॉलिंगसोबत व्हिडीओ कॉलिंगचे फिचर्स देखील जोडले आहे. यामाध्यमातून एकावेळी ८ जण व्हिडीओ कॉलवर बोलू शकतात.
याआधी ४ जण
हे फिचर येण्याआधी व्हॉट्सएप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त ४ जण एकावेळी ग्रुप व्हिडीओ कॉलवर बोलू शकत होते. आता ८ जण यावर बोलू शकणार आहेत. व्हॉट्सएप अपडेटला ट्रॅक करणारी लोकप्रिय चीनी टेक्निकल साईट वेब बीटा इंफोने आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली.
भारतीय यूजर्ससाठी
व्हॉट्सएप लवकरच दोन अब्ज युजर्ससाठी ऑडीओ किंवा व्हिडीओ ग्रुप कॉलमध्ये मेंबरची संख्या वाढवण्याची तयारी दाखवली आहे. यामध्ये भारतातील ४० कोटी जण सहभागी आहेत.
ट्वीटरवर माहिती
एंड्रॉइड आणि आयोएससाठी ग्रुप व्हिडीओ कॉलची मर्यादा ८ इतकी वाढवण्यात आल्याची माहिती वेब बीटा इंफोने ट्वीट करुन दिली.
व्हॉट्सएप अपडेट
यासाठी टेक्सलाईफतून २.२०.५०.२५ बीटा अपडेट करण्याची गरज आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरमधून २.२०.१३३ इंस्टॉल करावे लागेल.
एप्पल फेसटाईमवर एकावेळी ३२ जण
इतर यूजर्सला देखील आपले वर्जन अपडेट करणयाची गरज आहे. तसेच ८ सदस्यांसोबत कनेक्ट होण्यासाठी बीटा अपडेटचा उपयोग करावा लागणार आहे. एप्पलच्या फेसटाईम व्हिडीओ कॉलिंगमध्ये एकावेळी ३२ जण तर फेसबुक मॅसेंजरसोबत एकावेळी ५० जण जोडले जाऊ शकतात.
[ad_2]
Source link