[ad_1]
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Corona Virus) चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून आता तो भारतातही पोहचला असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ आणि ‘रियलमी’ने या व्हायरसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ‘Xiaomi’ कंपनीने मार्च २०२० मध्ये कोणत्याही ऑन ग्राऊंड प्रोडक्ट लॉन्च करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
‘शाओमी’ने दिल्लीत १२ मार्च रोजी होणारा इव्हेट रद्द केला आहे. ‘रेडमी’ नोट सीरीज १२ मार्च रोजी १२ वाजता लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लॉन्च होणार आहे. नव्या सीरीजमध्ये कंपनी Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro स्मार्टफोन लॉन्च करु शकते.
Due to recent reports of COVID-19 #CoronaOutbreak, we’ve decided to not host on-ground product launch events in March due to safety concerns.
We’d like to clarify that the upcoming #RedmiNote launch will be live streamed.
We urge you to stay safe! #NoMiWithoutYou pic.twitter.com/cXREQOi44F
— Redmi India (@RedmiIndia) March 3, 2020
‘रियलमी’नेही दिल्लीत होणाऱ्या realme 6 series लॉन्च इव्हेंट रद्द केला आहे. हा स्मार्टफोन ५ मार्च रोजी रिलीज होणार होता. कंपनीने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा लॉन्च इव्हेंट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ माधव यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.
कंपनीने ट्विट करत, ठरलेल्या तारखेलाच ते स्मार्टफोनची सीरीज आणि रियलमी बँड लॉन्च करणार आहेत. पण हे लॉन्चिंग लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे करण्यात येणार आहे. कंपनी realme 6 आणि realme 6 pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करत आहे.
In light of current reports of #coronavirus impact & related advisory by health officials to maintain social distance as a precautionary measure, I’m calling off our biggest event. Will still give live speech in stadium with you watching #realme6series event online. #HealthFirst
— Madhav 5G (@MadhavSheth1) March 3, 2020
कोरोना व्हायरसचं वाढतं थैमान संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरत आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे भारताच्या आरोग्य मंत्रालयाने इटली, ईराण, साऊथ कोरिआ आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केला आहे. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आला आहे.
[ad_2]
Source link