[ad_1]
रिअलमी बड्स एअर
स्मार्टफोन मार्केटमधील मोठ्या-लहान सर्वच ब्रँडना टक्कर देणाऱ्या रिअलमीनं अॅपल एअर पॉड्ससारखे हुबेहूब दिसणारे बड्स एअर हल्लीच लाँच केले. कस्टमाइज्ड आर वन चिप आणि ब्लूटूथ वर्जन ५.० असलेल्या रिअलमी बड्स एअर बड्समध्ये सुपर लो लॅटेन्सी, गुगल फास्ट पेअर, वेअर डिटेक्शन, डायनॅमिक बास ड्रायव्हर्स, नॉइज कॅन्सलेशन डुएल माइक ही खास वैशिष्ट्यं आहेत. यामध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट असून आधुनिक यूएसबी सी टाइप चार्जिंग पोर्ट देण्यात आलं आहे. यातील १२ मिलीमीटर ड्रायव्हर्समुळे तुम्हाला गाणी ऐकताना, व्हिडीओ बघताना, कॉलवर बोलताना चांगली साऊंड क्वॉलिटी अनुभवता येईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे सुपर लो लॅटेन्सी मोड. हे इअरबड्स कानात घालून दोन्ही बाजूंनी टॅप करून तुम्ही हा मोड सुरू करू शकता. तसंच गुगल असिस्टंट वापरू शकता. गुगल फास्ट पेअर असल्यामुळे पाहिल्यांदा फक्त तुम्हाला हे कनेक्ट करावे लागतील. त्यानंतर तुम्ही केसमधून इयरबड्स बाहेर काढताच स्मार्टफोनसोबत पेअर होतील. यामध्ये वेअर डिटेक्शनमुळे तुम्ही मल्टी मीडिया अॅक्सेस करताना ऑटो प्ले आणि पॉजसुद्धा अनुभवू शकता. या वायरलेस बड्समध्ये सिंगल, डबल, ट्रिपल टॅप करून तुम्ही म्युझिक प्ले, पॉज, स्कीप आणि कॉल घेऊ किंवा कट करू शकता. यामध्ये भविष्यात टॅप फीचर्स येण्याची शक्यता आहे. डिव्हाइस आणि चार्जिंग केस मिळून १७ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम आहे, असा कंपनीचा दावा आहे. सिंगल चार्जनंतर सलग अडीच ते तीन तासांचा प्ले बॅक टाइम तुम्हाला मिळतो. सध्या बाजारात याची किंमत ₹३९९९ रुपये असून सध्या फक्त पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. लवकरच काळ्या आणि पिवळ्या रंगातसुद्धा उपलब्ध होतील.
लेनोवो एच टी १० आणि प्रो टीडब्ल्यूएस
सुप्रसिद्ध लॅपटॉप आणि मोबाइल कंपनी लेनोवोचे एच टी १० आणि एच टी १० प्रो टीडब्ल्यूएस हेसुद्धा बजेट वायरलेस बड्सच्या यादीत उत्तम पर्याय आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे यांचा बॅटरी बॅकअप. सिंगल चार्जनंतर आठ तास चालतं. यासोबत ६० एमएएच क्षमता आणि २ लिथिअम पोलिमेर बॅटरी देण्यात आली आहे. एच १० आणि एच १० प्रोमध्ये ८ तास वायरलेस बड्सवर व चार्जिंग केसमध्ये ४० तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम असा एकूण ४८ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम मिळू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. यामध्येसुद्धा ब्लूटूथ वर्जन ५.० असून क्वॉलकॉमची चिपसेट आहे. २० मीटर ब्लूटूथ रेंज हे लेनोवोच्या ट्रू वायरलेस बड्सचं अजून एक वैशिष्ट्य आहे. सामान्यतः ब्लूटूथची रेंज तुम्हाला १० मीटरपर्यंतच मिळते; पण यामध्ये ती दुप्पट देण्यात आली आहे. लेनोवो एच टी १० आणि एच टी १० प्रो दोन्ही आयपीएक्स ५ सर्टीफाइड असल्यामुळे वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ आहेत. जिम, स्विमिंग किंवा पावसातसुद्धा तुम्ही हे दोन्ही डिव्हाइस बिनधास्त वापरू शकता. एच टी १० प्रोमध्ये ‘लेनोवो EQ मोड’ आहे. या मोडमध्ये स्टँडर्ड प्युअर बास मोड आणि एक्स्ट्रा बास मोड असे दोन वेगळे पर्याय तुम्हाला अनुभवता येतील. गाण्याप्रमाणे तुम्ही आवडीचा पर्याय निवडू शकता. लेनोवो एच टी १० आणि एच टी १० प्रो यांची किंमत₹ टीडब्ल्यूएस ३७९९ रुपये आणि₹ ४१९९ रुपये इतकी असून सध्या हे दोन्ही फक्त काळ्या रंगात उपलब्ध आहेत.
जेबीएल सी१०० टीडब्ल्यूएस
म्युझिक डिव्हाइससाठी प्रसिद्ध असणाऱ्या जेबीएलनं नुकतेच जेबीएल सी १०० टीडब्ल्यूएस हे इयरबड्स बाजारात आणले आहेत. यामध्ये ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट असून यामधील ५.८. मिलीमीटर ड्राइव्हर्स आणि प्युअर बासमुळे कॉलिंग, संगीत ऐकण्याचा उत्तम अनुभव तुम्हाला घेता येईल. सिंगल चार्जनंतर यामध्ये तुम्हाला सलग ५ तास म्युझिक प्लेबॅक टाइम मिळतो. डिव्हाइस आणि चार्जिंग केस मिळून एकत्रितपणे तुम्हाला १७ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम मिळू शकतो. यामधील ऑटो सिंक पर्यायामुळे केसमधून काढल्या बरोबर लगेच हा डिव्हाइस तुमच्या स्मार्टफोनसोबत पेअर होतो. यामध्ये एकदा टॅप करून तुम्ही गुगल असिस्टंट आणि सिरीसुद्धा वापरू शकता. जेबीएलचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त बड्सचा पर्याय आहे. याची किंमत ₹३९९९ रुपये आहे. हे पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.
नॉइज शॉट्स एक्सओ
मागच्या काही वर्षात स्वस्त आणि मस्त टीडब्ल्यूएससाठी ओळखला जाणारा ब्रँड म्हणजे ‘नॉइज’. नॉइज शॉट्स एक्सओ हा आतापर्यंतचा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये ब्लूटूथ वर्जन ५.० असून क्वॉलकॉमची आधुनिक चिपसेट वापरण्यात आली आहे. एचडी साऊंड आणि नॉइज कॅन्सलेशनचा उतम अनुभव तुम्हाला यामध्ये घेता येईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे वायरलेस चार्जिंग आणि यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. सिंगल चार्ज नंतर तुम्ही सहा तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅकचा आनंद घेऊ शकता. यामध्ये चार्जिंग केस सोबत ३६ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम मिळतो. IPX7 हे उत्तम दर्जाचे सर्टीफिकेशन असल्यामुळे पावसात किंवा जॉगिंग, जिम इत्यादी करताना तुम्ही बिनधास्त वापरू शकता. नॉइज शॉट्स एक्सओमध्ये टचचा वापर देण्यात आला आहे. नॉइज शॉट्स एक्सओ स्पेस ग्रे, रोज गोल्ड आणि मेटॅलिक व्हाइट अशा ३ आकर्षक रंगात उपलब्ध असून याची किंमत ₹५४९९ रुपये इतकी आहे.
जिओ करणार धमाका; स्मार्टफोन फक्त ३ हजारांत
जगात सर्वाधिक विकला जाणारा ‘हा’ स्मार्टफोन
[ad_2]
Source link