[ad_1]
व्हॉट्सअॅप डार्क मोड फीचर हे आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे नवीन फीचर्स सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. कंपनीच्या नव्या फीचर्समुळे युजर्संना आणखी चांगली सेवा देण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपचे हे फीचर कमी प्रकाशात चांगली व्हिजिबिलिटी देते. त्यामुळे युजर्संच्या डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही. हे नवीन फीचर्स आल्यामुळे घरात कमी प्रकाश असेल किंवा अंधार असेल तर अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप वापरणे सहज आणि सोपे होणार आहे. कंपनीने हे फीचर ३ मार्च रोजी लाँच केले आहे. २०१८ मध्ये या फीचरची चाचणी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्संना या फीचरची फार उत्सुकता लागली होती.
डार्क मोड चांगले करण्यासाठी कंपनीने व्हॉट्सअॅपच्या यूआयसोबच डिझाइन केले आहे. यासाठी Readability आणि Information Hierarchy या दोन्हीवर फोकस करण्यात आले आहे. यासाठी खास रंगाचा वापर करण्यात आला आहे. युजर्संच्या डोळ्यांवर काहीच परिणाम होणार नाही, यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे. हे फीचर अँड्रॉयड आणि आयफोन या दोन्ही युजर्ससाठी आहे. या फीचरमद्ये केवळ चॅट हेड सोबतच चॅट बॅक ग्राउंडही डार्क होणार आहे. कंपनीने यासाठी अनेक रंगाचा वापर केला आहे. हे फीचर अँड्रॉयड ९ पाय आणि आयओएस १३ वर किंवा त्यावर जाऊन काम करू शकते. अँड्रॉयड १० आणि आयओएस १३ युजर्स सिस्टमच्या सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर ऑन करू शकते. तर अँड्रॉयड ९ युजर्ससाठी WhatsApp Settings > Chats > Theme > select ‘Dark’ याप्रमाणे डार्क मोड ऑन करू शकता. म्हणजेच पहिल्यांदा व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जा. चॅटला टॅप करा. टॅपिंगनंतर डार्क थीमची निवड करा. त्यानंतर डार्क मोडचा आनंद घ्या.
शाओमी-रियलमीला करोना व्हायरसचा फटका
ब्लूटूथ इअर बड्स; दणक्यात वाजू द्या!
[ad_2]
Source link