वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेल, ऑफर्स मिळणार

[ad_1]

चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) ने आपली लेटेस्ट वनप्लस ८ सीरिज भारतात नुकतीच लाँच केली आहे. ग्राहकांना आता या सीरिज अंतर्गत वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइट, स्टोर, ई-कॉमर्स साइट आणि अॅमेझॉनवरून खरेदी करता येवू शकणार आहे. कंपनीने या फोनसोबतच भारतीय बाजारात वनप्लस बुलेट झेड ईयरफोन सुद्धा लाँच केला आहे. वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो २९ मे पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. परंतु, त्याआधी कंपनी १८ मे रोजी दुपारी ठीक २ वाजता एक स्पेशल अर्ली अॅक्सेस असलेला सेल सुरू करणार आहे. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने याची घोषणा कंपनीने केली नव्हती. परंतु, आता कंपनीने याची घोषणा केली आहे. अॅमेझॉनने प्री-बुकिंगसाठी दोन्ही फोनची वेबसाइटवर माहिती दिली आहे. भारतात वनप्लसच्या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे याआधी दिसले आहे. वनप्लसच्या ८ सीरिजला आता कसा प्रतिसाद मिळतोय, हे सेलनंतर स्पष्ट होणार आहे.

​OnePlus 8, OnePlus 8 Pro सेलची माहिती

maharashtra times

वनप्लस रेड केबल क्लबच्या सदस्य सेक्शनवर कंपनीने एक घोषणा केली आहे. वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो येत्या २९ मे पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच वनप्लसने हेही सांगितले आहे की, कंपनी १८ मे रोजी दुपारी ठीक २ वाजता एक स्पेशल अर्ली अॅक्सेस असलेला सेल सुरू करणार आहे. या सेलमध्ये OnePlus 8 5G स्मार्टफोन लिमिटेड स्टॉकमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

​किंमत वाढणार पण हेही मिळणार

maharashtra times

‘डिस्कवर’ सेक्शनमध्ये वनप्लसने ही माहिती शेअर केली आहे. वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो साठी लिमिटेड एडिशन पॉप अप बंडलची किंमत रिटेल किंमतीपेक्षा १ हजार रुपयांनी जास्त असणार आहे. परंतु, यात OnePlus Bullet Wireless Z (ब्लॅक) इयरफोन, सियान बम्पर केस आणि कार्बन बम्परचा समावेश आहे. पॉप-अप बंडलचा २८ मे रोजी रेड केबल क्लब सदस्यांसाठी एक स्पेशल सेल उपलब्ध असणार आहे. OnePlus 8 (ऑनिक्स ब्लॅक, ग्लेशियल ग्रीन) च्या पॉप-अप बंडल ची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. तर OnePlus 8 Pro (ऑनिक्स ब्लॅक, ग्लेशियल ग्रीन) च्या पॉप-अप बंडल ची किंमत ६० हजार ९९९ रुपये आहे.

​खरेदीवर या ऑफर्स मिळणार

maharashtra times

कंपनी स्मार्टफोनच्या विक्रीत काही एक्सक्लूसिव ऑफर्स देणार आहे. ज्यात वनप्लस ८ प्रो खरेदीवर ३ हजार रुपयांची तात्काळ सूट आणि वनप्लस ८ खरेदीवर २ हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना अॅमेझॉन आणि oneplus.in वर १२ महिन्यांपर्यंत कोणत्याही व्याजाविना ईएमआयवर फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. SBI क्रेडिट कार्डवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ महिने नो ईएमआय मिळणार आहे. तसेच ६ हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे. ज्यात जिओच्या ३४९ रुपयांच्या ४० प्रीपेड रिचार्जवर १५० रुपयाची सूट मिळणार आहे.

​OnePlus 8, OnePlus 8 Pro ची किंमत

maharashtra times

वनप्लसने ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमधील स्मार्टफोन भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे ४१ हजार,९९९ रुपये, ४४ हजार ९९९ रुपये आणि ४९ हजार ९९९ रुपये आहे. तर वनप्लस ८ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये, आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात या फोनला कसा प्रतिसाद मिळतोय, हे सेलनंतर स्पष्ट होईल.

​वनप्लस ८ चे खास फीचर्स

maharashtra times

वनप्लस ८ या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनचा स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. वनप्लसने या फोनमध्ये फ्लूड डिस्प्ले दिला आहे. युजर्संना या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी ओआयएस आणि ईआयएस, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि एक मायक्रो सेन्सर सह असलेला ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप मिळणार आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजसाठी २५६ चा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लसच्या याआधीच्या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.

वनप्लस ८ प्रो चे खास फीचर्स

maharashtra times

या फोनमध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले, क्यूएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेत एक कन्फर्ट झोन फीचर आहे. या फोनमध्ये दिलेला सर्वात बेस्ट डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. वनपल्स ८ प्रो डिस्प्ले १० बिट कलर डेप्थ सपोर्ट करते. फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, ३एक्स टेलिफोटो कॅमेरा व एक कलर फिल्टर कॅमेरा दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, ड्युअल स्टीरियो स्पीकर्स, ४५१० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

[ad_2]

Source link

Leave a comment