aarogya setu app: नागपूरः ४४ हजार ग्रामस्थांकडे ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ – aarogya setu app download to 44,000 villagers in nagpur district

[ad_1]

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने सरकारने विविध उपाययोजना करीत आहे. यात ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपचाही समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात करोनाबाबत नागरिकांना अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. जिल्ह्यातील ४४ हजाराहून अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अ‍ॅप आहे. अॅपचा वापरकर्ता सुरक्षित आहे काय, याचीही माहितीही या अ‍ॅपच्या माध्यमातून दिसते. या अ‍ॅपमध्ये मोबाइल नंबर, ब्ल्यूटुथ आणि लोकेशन डाटाचा वापर केला जातो. ज्यावेळी ‘अ‍ॅप युजर’ करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो त्यावेळी हे ‘अ‍ॅप’ संबंधित व्यक्तीला सावधगिरीचा इशारा देतो.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हे अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ‘आपले सरकार सेवा केंद्र’चे जिल्हा समन्वयक किशोर पठाडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या ७६८ ग्राम पंचायतींमधील सेवा केंद्राच्या संचालकांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन ग्रामस्थांना या अ‍ॅपचे फायदे समजावून सांगितले. हे अ‍ॅप डाउनलोड करुन घेण्यासाठी मदत केली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ४४ हजारांवर नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. त्याचा वापरही सुरू झाला आहे.

[ad_2]

Source link

Leave a comment