x-ray: शाओमीच्या या २ स्मार्टफोनमध्येही X-Ray कॅमेरा फीचर – poco f1, xiaomi mi 8 had x-ray cameras way before the oneplus 8 pro

[ad_1]

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात लाँच झालेला वनप्लस ८ प्रो (OnePlus 8 Pro) फोन आपल्या X-Ray कॅमेरा फीचर मुळे खूप चर्चेत आला होता. वनप्लस ८ प्रो आधीसारखा स्मार्टफोन नाही. ज्यात हे फीचर देण्यात आले होते. याआधी शाओमीच्या पोको एफवन (Poco F1) आणि शाओमीचा एमआय ८ (Mi 8) या दोन फोनमध्येही हे फीचर देण्यात आलेले आहे. या दोन्ही स्मार्टफोनसाठी प्ले स्टोरवर डेडिकेटेड अॅप सुद्धा उपलब्ध आहेत.


वाचाः दमदार बॅटरी-जबरदस्त फीचरसह मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन लाँच

फ्रंट कॅमेऱ्यात आहे हे फीचर
शाओमीच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये हे फीचर फ्रंट कॅमेऱ्या दिले आहे. तसेच याचा वापर करण्यासाठी अतिरिक्त अॅपची आवश्यकता आहे. यामुळे या दोन्ही फोनच्या प्रायव्हसीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

वनप्लसने हटवले X-Ray फीचर
वनप्लस ८ प्रो (OnePlus 8 Pro) लाँचिंग करण्यात आल्यानंतर चर्चेत होता. या फोनमधील कॅमेरा फिल्टरची चर्चा झाली. वनप्लस ८ प्रोचे हे खास कॅमेरा फिल्टर प्लास्टिकच्या वस्तूंपासून आरपार (पारदर्शक) पाहू शकत होते. आता कंपनीने या फोटोक्रोम फीचर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आज चीनमधील मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट केलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, हे फीचर खासगी माहितीसाठी धोका ठरू शकते. त्यामुळे कंपनीने याला हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचाः कॉल रेकॉर्डिंग ते सीक्रेट चॅटपर्यंत….व्हॉट्सअॅपची ही ट्रिक्स माहितेय?

गेल्या महिन्यात लाँच झाला होता वनप्लस
कंपनीने गेल्या महिन्यात वनप्लस ८ सीरिज लाँच केली होती. वनप्लस ८ प्रो मध्ये ६.७८ इंचाची स्क्रीन क्यूएचडी प्लस स्क्रीन दिली होती. डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत आहे. डिस्प्लेत एक कंफर्ट झोन फीचर आहे. वनप्लसचा दावा आहे की, वनप्लस ८ प्रो मध्ये देण्यात आलेले बेस्ट स्मार्टफोन डिस्प्ले आहे. याला डिस्प्ले मॅट ए प्लसचे सर्टीफिकेट मिळाले आहे. वनप्लस ८ प्रो डिस्प्ले १० बिट कलर डेप्थ सपोर्ट करते. फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. तसेच याशिवाय, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, ३एक्स टेलिफोटो कॅमेरा, एक कलर फिल्टर कॅमेरा दिला आहे.

वाचाः108 MP कॅमेऱ्याचे ५ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या सविस्तर

वाचाःBSNLचा जबरदस्त प्लान, रोज मिळणार १.८ GB डेटा

वाचाःनोकियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व कंपन्यांना टाकले मागे

[ad_2]

Source link

Leave a comment