weak signal : करोनाः कोणत्याही कंपन्यांचं नेटवर्क वापरता येणार? – weak signal? you may get connected to another telecom company

[ad_1]

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांच्यासमोर आता एक नवे संकट उभं ठाकलं आहे. लॉकडाऊनच्या काळात टेलिकॉम नेटवर्कवर व्हाईस कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर वाढणारा असल्याने निश्चित टेलिकॉम कंपन्यांवरचा लोड वाढणार आहे. त्यामुळे हा लोड कमी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या आता Intra Circle रोमिंग (ICR) उघडण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे हे शक्य झाल्यास ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कची सेवा मिळणे शक्य होणार आहे.

इंट्रा सर्कल रोमिंग म्हणजे जर एखादा व्होडाफोनचा ग्राहक कॉल करतोय, आणि त्या ग्राहकाला या ठिकाणी रेंज कमी मिळते असले तर तर त्या ग्राहकाला जिओ किंवा एअरटेलचे नेटवर्क कनेक्ट होईल. या ग्राहकाला नो सिग्नलसाठी झगडावे लागणार नाही. तसेच मोबाइल ग्राहकांना कॉलिंगची सुविधा निश्चितपणे मिळत राहिल. जर आयसीआरमध्ये एखादा ग्राहक डेटाचा वापर करीत असेल आणि त्याला लो स्पीड इंटरनेट मिळत असेल तर तो तत्काळ अन्य नेटवर्कवर आपोआप शिफ्ट होईल, व त्याला फास्ट डेटा मिळेल. यासंबंधी भारती एअरटेलने व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ, बीएसएनएल आणि एमटीएनएलला पत्र लिहिले आहे.

सध्या देशभरात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. तसेच देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण मोबाइलवरून संपर्क साधतात किंवा मोबाइलवर जास्त वेळ घालवणे सुरू आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. यापुढेही निश्चित टेलिकॉम कंपन्यांवरचा लोड वाढणार आहे. त्यामुळे हा लोड कमी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या आता Intra Circle रोमिंग (ICR) उघडण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे हे शक्य झाल्यास ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कची सेवा मिळणे शक्य होणार आहे.


भागीदारी खरेदीवरून जिओ-फेसबुकमध्ये चर्चा?

करोना व्हायरसचा फटका; ‘या’ कंपन्यांच्या सेवा बंद

करोना व्हायरसः अॅमेझॉनची भारतातील सेवा बंद



[ad_2]

Source link

Leave a comment