[ad_1]
पहिला फोटो

दावा
या फोटोतून हा दावा करण्यात येत आहे की, इटलीत सध्या कोणताही मित्र, कुटुंबातील व्यक्ती किंवा शेजारी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करीत नाही. फोटोत जो मजकूर लिहिला आहे त्याचे भाषांतर म्हणजे, हा संसर्गजन्य आजार आहे. आपल्या घरातून बाहेर पडण्याआधी, ध्यान धरून या फोटोला पाहा. जबाबदार नागरिक बना.
खरं काय आहे?
हा फोटो २०११ मधील हॉलिवूड चित्रपट Contagion मधून घेतलेला स्क्रीनग्रॅब ाहे. या फोटोचा इटलीतील करोना व्हायरसशी काहीही संबंध नाही.
कशी केली पडताळणी?
या फोटोला रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
Basement Rejects नावाची एक वेबासाइटवर चित्रपट Contagion च्या रिव्ह्यूचे एक आर्टिकल मिळाले. हा रिव्ह्यू १४ जानेवारी २०१४ रोजी प्रकाशीत झाला होता. यात हाच स्क्रीनग्रॅब आहे. जो आता शेअर केला जात आहे.
या चित्रपटाची कथा सध्याच्या करोना व्हायरसच्या संकटाशी मिळती जुळती आहे.
निष्कर्ष
२०११ मध्ये आलेल्या Contagion चित्रपटातील फोटोला इटलीतील करोना व्हायरसचे रूग्ण आहेत, अशा चुकीच्या दाव्यासह शेअर केले जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
दुसरा फोटो

दावा
या फोटोतून दावा करण्यात येत आहे की, इटलीतील करोना व्हायरसमुळे रस्त्यांवर मृतदेह पडले आहेत. हे मृतहेद उचलण्यासाठी कोणीही नाही.
खरं काय आहे?
हा फोटो २०१४ चा आहे आणि जर्मनीच्या फ्रँकफर्टमधील एका आर्ट प्रोजेक्टचा भाग आहे. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.
कशी केली पडताळणी?
रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला South China Morning Post चे २६ मार्च २०१४ रोजी छापलेली एक बातमी मिळाली. या बातमीतील कॅप्शननुसार, हा फोटो नाजी बंद शिबीरच्या ५२८ पीडितांच्या समर्थनार्थ हे आर्ट प्रोजेक्ट होते.
निष्कर्ष
२०१४ मध्ये जर्मनीत काढलेला फोटो आता इटलीतील करोना व्हायरसमुळे लोकांच्या मृत्युमुखींचा फोटो म्हणून शेअर केला जात आहे.
[ad_2]
Source link
Mình đã bookmark để đọc lại sau.
Xứng đáng được chia sẻ rộng rãi.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
Web cung cấp thông tin đầy đủ và chi tiết về các trò chơi.
Web lừa đảo, đánh cắp thông tin người dùng, cảnh báo không nên truy cập!
Web lừa đảo, đánh cắp thông tin người dùng, cảnh báo không nên truy cập!