vivo v19 pre booking : विवो V19 स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू, २६ मार्च रोजी होणार लाँच – vivo v19 pre booking start know expected price offers and specifications

[ad_1]

नवी दिल्लीः चीनची टेक कंपनी विवो आपला लेटेस्ट व्ही १९ (Vivo V19) स्मार्टफोन २६ मार्च रोजी लाँच करणार आहे. लाँचिंग आधी कंपनीने या फोनची प्री बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन याआधी इंडोनेशियामध्ये लाँच केला होता. परंतु, भारतात लाँच होणारा स्मार्टफोन थोडा वेगळा असणार आहे.

Vivo V19 ची संभावित किंमत

मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने या फोनची किंमत ३५ हजार रुपयांपेक्षा कमी करण्याचे ठरवले आहे. तसेच ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर १० टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकतो. कंपनीने या फोनच्या किंमती संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उघड केली नाही.

Vivo V19 ची खास वैशिष्ट्ये


युजर्संना या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले मिळणार आहे. तसेच जबरदस्त परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७१२ सह ८ जीबी रॅमचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

Vivo V19 चा कॅमेरा


कंपनी या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जावू शकतो. तसेच या फोनमध्ये युजर्सला फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळण्याची शक्यता आहे.

Vivo V19 ची बॅटरी


या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ४जी एलटीई, ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ ५.० आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट यासारखे फीचर्स मिळू शकतात.

सॅमसंग गॅलेक्सी M21 चा आज पहिला सेल

‘वर्क फ्रॉम होम’साठी स्वस्त व मस्त ‘टॉप ५’ लॅपटॉप

रेडमी K30 प्रो २४ मार्चला लाँच होणार, पाहा किंमत

जिओचा ‘वर्क फ्रॉम होम’ पॅक; १०२ जीबी डेटा



[ad_2]

Source link

Leave a comment