Tutela report : एअरटेलने जिओ आणि व्होडाफोनला मागे टाकले – bharti airtel beats vodafone idea and jio by achieving 7.4 mbps average download speed: tutela report

[ad_1]

नवी दिल्लीः भारती एअरटेलने डाउनलोड स्पीडमध्ये व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. Tutela च्या लेटेस्ट स्टेट मोबाइल नेटवर्क्स रिपोर्टमध्ये अॅव्हरेज डाउनलोड स्पीडमध्ये भारती एअरटेल सर्वात पुढे आहे. तर अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन सर्वात पुढे आहे. विशेष म्हणजे डाउनलोड आणि अपलोड मध्ये जिओ इतर नेटवर्कच्या तुलनेत मागे असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

१ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान ५७३ अब्ज मेझरमेंट्स जमा करण्यात आले आहेत. यावरून ही माहिती सांगण्यात आली आहे. Tutela कडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय, ६.५ कोटीहून अधिक जास्त स्पीड टेस्ट नोंदणी करण्यात आली आणि ९० कोटी लेटेंसी टेस्ट करण्यात आले आहे. ऑल राउंड अॅनालिसिस मध्ये एअरटेलने इतर कंपन्यांना को अॅक्सिलेंट कन्सिस्टेंट क्वॉलिटी, कोर कन्सिस्टेंट क्वॉलिटी, मिडियन डाउनलोड थ्रूपूट आणि लेटेंसी या चार गटात एअरटेलने बाजी मारली आहे.


एअरटेलचे सर्वात बेस्ट नेटवर्क

ट्यूटेलाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय, एअरटेलने चांगला कन्सिस्टेंट क्वॉलिटी दिली आहे. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत एअरटेलचा परफॉर्मन्स १० टक्के चांगला राहिला आहे. जिओच्या तुलनेत एअरटेलचा कोर कन्सिस्टेंट क्वॉलिटी ३.६ टक्के उच्च राहिली आहे. डाउनलोडमध्ये भारती एअरटेलची अॅव्हरेज स्पीड ७.४ एमबीपीएस राहिली. तर व्होडाफोन आयडियाची स्पीड ६.५ एमबीपीएस राहिली. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलची स्पीड ५.३ आणि २.९ एमबीपीएस राहिली.


अपलोडमध्ये व्होडाफोन पुढे

अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन आयडियाची स्पीड सर्वात जास्त म्हणजे ३.७ एमबीपीएस आहे. त्यानंतर ३.५ एमबीपीएससह भारती एअरटेल दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर ३.२ एमबीपीएस सह रिलायन्स जिओ आहे. चौथ्या स्थानावर १.७ एमबीपीएस सह बीएसएनएल आहे.

‘रेडमी नोट ९ सीरिज’ आज दुपारी लाँच होणार

BSNL च्या २४७ ₹ प्लानमध्ये ३ GB डेटा

करोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘हे’ करा

‘या’ देशात फेक WhatsApp ला लोकांची पसंती



[ad_2]

Source link

5 thoughts on “Tutela report : एअरटेलने जिओ आणि व्होडाफोनला मागे टाकले – bharti airtel beats vodafone idea and jio by achieving 7.4 mbps average download speed: tutela report”

Leave a comment