Corona virus : करोनाः अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही – cyber cell is the focus on rumor of corona virus says pune police

[ad_1]

पुणे : करोना विषाणूसंदर्भात सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या सायबर सेलचे लक्ष आहे. ‘अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती सायबर सेलचे पोलिस उपायुक्त संभाजी कदमयांनी दिली.

सोशल मीडियावरून ‘करोना’शी निगडित मोठ्या प्रमाणावर अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध चर्चांना पेव फुटत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ‘व्हॉट्सअॅप’वर ‘करोना’बाबतचे अनेक मेसेज ‘फॉर्वर्ड’ होत असल्याची बाब समोर आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अशा अफवा पसरविणाऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर सायबर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी खात्री न करता कोणतीही ‘पोस्ट’ पुढे पाठवू नये; तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेंतर्गत ‘सोशल मीडिया लॅब’ काम करत आहे. या लॅबमार्फत अफवा पसरविणारे मेसेज आढळून आल्यास तत्काळ ते हटविले जात आहेत. सोशल मीडियावर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन ‘करोना’संबंधी विभागीय आयुक्त यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमदेखील उपस्थित होते. त्यांनी बैठकीमध्ये करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासंदर्भात काही सूचना केल्या; तसेच, पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व अधिकाऱ्यांना करोना विषाणूबाबतची माहिती दिली आणि काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन देखील केले.

‘करोना’च्या फेक न्यूज विरोधात गुगलची मोहीम

BSNL च्या २४७ ₹ प्लानमध्ये ३ GB डेटा

करोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘हे’ करा

BSNL च्या २४७ ₹ प्लानमध्ये ३ GB डेटा



[ad_2]

Source link

Leave a comment