♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Student Portal मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणेबाबत नवीन माहिती

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ई-गव्हर्नन्स अंतर्गत N.I.C. पुणे यांचेकडून विकसित करण्यात आलेल्या student portal मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद घेणे अनिवार्य आहे. याबाबत उपरोक्त संदर्भ क्र. 1. 2,3 व 4 च्या पत्रान्वये आपणास कळविण्यात आले होते. तसेच वेळोवेळी VC द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये देखील विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमधील माहिती त्यांच्या आधार क्रमांकानुसार नोंदविण्याच्या/अद्यावत करावयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. परंतु अद्याप याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद घेणे अद्याप बाकी असून ज्या काही विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्यामध्येही बऱ्याच प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत.

सदर प्रकरणी संदर्भ क्र. 4 नुसार मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27/09/2022 रोजी online बैठक घेण्यात आलेली असून मा. संचालक महोदयांनी खालील प्रमाणे उपाय योजना राबवून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी / दुरुस्ती दिनांक 30/10/2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहे.

(अ) आधार नोंदणी करणेबाबत

(१) मा. जिल्हाधिकारी यांना विनंती करून त्यांचेकडून प्रत्येक तालुक्यास किमान २ आधार किट ऑपरेटरसह उपलब्ध करून घ्यावे. तसेच आधार कॅम्पस देखील आयोजित करावेत.

(२) शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग आणि student पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांचे नमूद केलेले नाव जन्म तारीख व लिंग हे आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत असल्याची खात्री करावी. जिथे आधार अपडेट करावयाचे विद्यार्थी जास्त आहेत तेथे गटशिक्षणाधिकारी यांनी Operators च्या कामाचे नियोजन करावे. आपल्या जिल्ह्यातील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आढावा बैठकीतून सरल पोर्टलवर आधार अपडेटसाठी शाळेंच्या स्तरावर मुख्याध्यापक यांना सूचना व मार्गदर्शन देण्याबाबत विनंती करावी.

(३) आधारची माहिती offline bulk मध्ये नोंदवून नंतर Online नोंदविण्यापेक्षा विद्यार्थीनिहाय स्वतंत्रपणे नोंदवावी की ज्यामुळे आधार नोंदणीची पुनरावृत्ती होणार नाही.

(४) ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढले गेलेले नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यास अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात यावी.

(५) सदर कामी आपलेकडील एम आय एस कॉर्डीनेटर, डाटा ऑपरेटर, विषयतज्ञ साधन व्यक्ती, विषयतज्ञ डाटा ऑपरेटर, फिरते विशेष शिक्षक यांना प्रत्येकी किमान १०० विद्यार्थीची जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या सर्वांचे शाळा भेटीच्या वेळापत्रकाचे नियोजन करून नियोजित शाळेंच्या मुख्याध्यापकांचे युजर आयडी व पासवर्ड घेऊन आधार नोंदणीच्या कामास सुरूवात करावी व त्यांचे कामावर नियंत्रण व पर्यवेक्षण करण्याचे काम संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांचेकडे सोपविण्यात यावे. तसेच त्यांनी देखील स्वतः शाळा भेटी देण्याचे नियोजन करावे. त्यांचे नियोजन शिक्षणाधिकारी यांनी नियंत्रण करावे.

(६) या कामाच्या प्रगतीचा आपण आढावा घेऊन दर सोमवारी त्याचा अहवाल संचालनालयास न चुकता सादर करावा.

(ब) आधार क्रमांकाच्या दुरूस्ती करणेबाबत

(१) शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे student पोर्टल मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत नसल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून तातडीची दुरुस्ती करावी. आधार कॅम्पस मध्ये याबाबत जागरूकतेने कार्यवाही करावी.

(२) आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास आधार कैम्पसची मदत घेण्यात यावी. दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाचा तपशील student पोर्टल मध्ये अद्यावत करण्यात यावा.

(३) Student पोर्टल मध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नमूद केले नसल्याची खात्री कारवी. अशा प्रकारे संपूर्ण कामाचा निपटारा दिनांक-३०/१०/२०२२ पर्यंत १००% पूर्ण करावा.

सदर आदेश PDF स्वरुपात

*संकलित मूल्यमापन 1  प्रथम सत्र प्रश्नपत्रिका  इयत्ता 1 ली ते ८ वी*  

*पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी  उपलब्ध* 

*सर्व विषयासहित* 

तसेच खालील लिंकवर  आपल्या इयत्तेच्या *आकारिक नोंदी* सुद्धा उपलब्ध आहेत 

📝  *इयत्ता पहिली*

📝  *इयत्ता  दुसरी*

📝  *इयत्ता  तिसरी*

📝  *इयत्ता  चौथी*

📝  *इयत्ता  पाचवी*

📝  *इयत्ता  सहावी*

📝  *इयत्ता  सातवी*

📝  *इयत्ता  आठवी*