पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

खालील गोष्टीतील नामे ओळख.

करीमचा प्रामाणिकपणा

करीम खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक, संस्कारी मुलगा होता. एकदा काही कारणाने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी बाहेर गेले होते. करीमला बसायला सांगून नोकर निघून गेला. करीम जिये बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले, “तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस?” मुलगा म्हणाला, ” इथे कोणीच नव्हते, सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले. नसते.कोणीच मला पहात नव्हते पण मी स्वतःला ते पहात होतो. मी स्वतःला फसवू शकत नाही.” शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला, “आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे नम्रतेने व प्रामाणिकपणे वागले तर जग सुखी होईल.”

( शिक्षकांनी वर्गात वरीलप्रमाणे गोष्ट सांगावी तसेच गोष्टीतील नामांची यादी विद्यार्थ्यांच्या मदतीने फळ्यावर लिहावी. विद्यार्थी सांगू न शकलेल्या नामांचीस्वतः फळ्यावर नोंद करावी. तसेच नामाची व्याख्या व उदाहरणे यातील संबंध यावर थोडक्यात चर्चा घ्यावी. नामे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात हे फक्त लक्षात आणून द्यावे.)

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नामाचे तीन प्रकार, त्यांच्या व्याख्या व उदाहरणे समजावून सांगावेत. तसेच स्वतःच्या मार्गदर्शनाखालीवर सांगितलेल्या ‘करीमचा प्रामाणिकपणा’ या गोष्टीमधील नामांची सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम या ३ प्रकारांमध्ये वर्गीकरण करून घ्यावे.)

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

5. Practice:

Try to frame new Wh types of questions and answer.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

1. Make new question using these words.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 04

समजून घेऊ या : आपत्ती प्रकार, आपत्ती व्यवस्थापन संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण 4- आपत्ती व्यवस्थापन

सराव करू या :

1. तुम्ही काय कराल ? (कोणतीही एक योग्य कृती लिहा.) 

अ) तुमच्या परिसरात वादळ येणार आहे असे समजले.

ब) महापुरामुळे पाण्यात काही लोक अडकले आहेत.

2) दुष्काळामुळे कोणकोणते परिणाम होतात थोडक्यात लिहा.

3) तुम्हाला माहिती असणाऱ्या मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तींची नावे लिहा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

कृती क्र. २) शहरांमधील समस्यांची यादी करा.

१) राहण्यास अपुरी जागा.

२)

३)

४)

मूल्यमापन प्रश्न

• पुढील प्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल?

१) कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना कोणती काळजी घ्याल?

उत्तर:

२) पुलावरून नदीमध्ये काही लोक कचऱ्याने भरलेल्या पिशव्या टाकत आहेत.

उत्तर:

३) लोक रस्त्यावर जुने टायर व कचरा जाळत आहेत.

उत्तर:

 विषय –  भूगोल 

पहिले काही बाबी आठवूया !

1) तापमान म्हणजे काय ?

2) सर्वाधिक तापमान कोणत्या ऋतुमध्ये असते?

काय समजले ?

(ही कृती करून तुला काय समजले किंवा शिकण्यास मिळाले? )

उत्तर :…………………………………………………..