पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

सक्षम बनू या

कृती -१ ( विद्यार्थ्यांशी त्यांच्या अनुभवाशी संबंधित चर्चा करून घ्यावी.)

आपल्या अवती भोवती विविध प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो, ते कोणकोणते आवाज असतात ? उदा. समजा तुम्ही बसस्थानकावर उभे आहात तर तुम्हाला कोणकोणते आवाज ऐकायला मिळतील ?

कृती-२ (शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या अनुभवाशी संबंधित चर्चा करावी.)

तुमच्या आजूबाजूला कोणकोणत्या घटना किंवा कार्यक्रम होतात ? उदा. उद्घाटन, वृक्षारोपण, रक्तदान इत्यादी अनेक.

अशा कार्यक्रमाना जायला तुम्हाला आवडते का ? कारण काय ?

+ सराव करू या

कृती- १ आवाजाशी संबंधित अनेक गाणी आपण ऐकतो जसे की किलबिल किलबिल पक्षी बोलती. …… ‘यासारखी आणखी कोणती गाणी विद्यार्थ्यांना सांगता येतील का हे विचारावे. तसेच ती गाणी म्हणून घ्यावीत.

कृती- २ ( शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी खाली दिलेल्या प्रश्नाद्वारे चर्चा करून घ्यावी.) तुमच्या परिसरामध्ये एक सार्वजनिक नळ आहे. तो बंद करण्यास लोक विसरतात तर तुम्ही काय कराल?

कल्पक होऊ या

कृती-१ विद्यार्थ्यांकडून आवाजदर्शक शब्द येणारी वाक्ये तयार करून घ्यावीत. उदा. पानांची सळसळ ऐकताच सर्वांचे लक्ष तिकडे गेले, मोबाईल, लॅपटॉप इंटरनेटसहित, परिसरातील उपलब्ध वाद्य, आवाज करणारी साधने उदा. वाळलेल्या शेंगा.

कृती-२ ( खालील मुद्द्यांवर गटामध्ये चर्चा करून घ्यावी . )

समजा तुमच्या वर्गाकडे बालदिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन दिले आहे, तर तुम्ही नियोजन करताना कोणत्या गोष्टींचा विचार कराल ते सांगा ?

 विषय –  गणित 

थोडं समजून घेऊ

बिंदू : बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवितात. बिंदूला नाव देण्यासाठी एक अक्षरी (Capital letters )चा उपयोग करतात.

रेषा : कागदावर बिंदू A व बिंदू B असे दोन भिन्न बिंदू घेऊन ते पट्टीच्या सहाय्याने जोडा. आपल्याला सरळ रेघ मिळते. ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढविता येते. या आकृतीला रेषा असे म्हणतात. कागदावर रेषा दाखवताना दोन्ही बाजूला अमर्याद आहे हे बाणांनी दाखवतात. गणितात रेषा म्हणजेच सरळ रेषा.

रेषाखंड : रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड. रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात. रेषाखंडाचे नाव दोन अक्षरी लिहितात. रेषाखंड हे थोडक्यात रेख असे लिहितात.

किरण : किरण हा रेषेचा एक भाग असून एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे जातो. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभबिंदू म्हणतात. किराणाचे नाव दोन अक्षरी सांगतात. नाव सांगताना आरंभबिंदू प्रथम घ्यावा.

छेदणाऱ्या रेषा : दोन रेषा एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात व त्यांच्या सामाईक बिंदूला छेदनबिंदू असे म्हणतात.

एकसंपाती रेषा : जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. त्यांच्या छेदन बिंदूला संपातबिंदू म्हणतात.

एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात तर दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते.

एकरेषीय बिंदू : जेव्हा तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात.

नैकरेषीय बिंदू: जेव्हा बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात.

प्रतल : सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. प्रतल चोहोबाजूंनी अमर्याद असते. प्रतलाला एक अक्षरी नाव देतात. समांतर रेषा : एकाच प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात.

 विषय –  इंग्रजी 

Sing the song again using other actions like- Sing a song, Dance around,

Nod your head,

Wave your hands.

Demo – When you are happy

And you know it,

Sing a song.

When you are happy

And you know it,

Sing a song.

When you are happy

And you know it,

And you really want to show it,

When you are happy

And you know it,

Sing a song.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

सराव करू या :

1) खालील विधाने दुरुस्त करून लिहा.

अ) हवेतील नायट्रोजनचे प्रमाण 21% आहे.

ब) पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो कार्बन डायॉक्साइडशी संयोग पावतो.

क) मृदेचा 25 से.मी. जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात.

2) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. (अरगॉन, ऑक्सिजन, झेनॉन )