♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस पहिला | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

शिक्षकांनी गाण्याची एकेक ओळ तालासुरात साभिनय म्हणून दाखवावी.विद्यार्थी त्यांच्या मागे साभिनय गाणे म्हणतील.

• ध्वनिफिती, ध्वनिमुद्रिका, मोबाईलइ. साहित्य वापरून कवितांची चाल ऐकावावी. 

• एखाद्या विद्यार्थ्याला गाणे म्हणण्यास सांगावे. इतर विद्यार्थी त्यांच्या मागे म्हणतील.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

आकाशातील सर्व वस्तूंना ‘खगोलीय वस्तू’ असे म्हणतात. रात्रीच्या वेळी आकाशात अनेक चांदण्या दिसतात. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश बसतो. 

    ग्रह स्वत:भोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरत असतात. आपली पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असते, पृथ्वीशिवाय सूर्याभोवती बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह फिरत आहेत. त्याचबरोबर उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह सुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. या सान्यांना एकत्रित सूर्यमाला असे म्हणतात. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती फिरतात त्यांना उपग्रह असे म्हणतात. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. 

बटुग्रह आपल्या सूर्यमालेत प्लूटो सारख्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते.

लघुग्रह – मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात.

गुरुत्वाकर्षण-  खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वत:कडे खेचण्याची शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची इतर ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. आपल्या पृथ्वीकडे सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, या शक्तीमुळे सर्व वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात. उदा. झाडावरून खाली पडणारे फळ जमिनीवर खाली पडते, वर फेकलेला चेंडू पुन्हा खाली पडतो.

सराव करू या

1. पौर्णिमेच्या रात्री दिसणारा चंद्राचा आकार पहिल्या चौकटीमध्ये काढा व बरोबर सात दिवसांनी रात्रीच्या वेळी आकाशाचे निरीक्षण करून चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र दुसऱ्या चौकटीत काढा.

2. पहिल्या पानावर दिलेल्या सूर्यमालेचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. 

अ) आपल्या सूर्यमालेतील बटुग्रहाचे नाव लिहा.

उत्तर:- ……………………………………………………………………

ब) सर्वात छोटा ग्रह कोणता आहे ?

उत्तर:- ……………………………………………………………………

क) चंद्र हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे ?

उत्तर:- ……………………………………………………………………

3. ओळखा पाहू मी कोण ?

अ) मी आहे एक शक्ती, सूर्य माझ्यामुळेच बनला सूर्यमालेचा राजा. कक्षेत येताच कोणी, खेचला जातो जवळ माझ्या.

उत्तर:- ……………………………………………………………………

ब) मी एक खगोलीय वस्तू फिरत राहते ग्रहाभोवती, नसेल जरी स्वत:चा प्रकाश चमकतो मात्र दिमाखात.

उत्तर:- ……………………………………………………………………

4. जर आपल्या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती अचानक नष्ट झाली तर काय होईल ?

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  परिसर अभ्यास 2 

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

१. काळाचे प्रकार कोणते?

२. इतिहास म्हणजे काय?

३. कालदर्शक शब्दांचे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ वर्गीकरण करा. शब्द- उद्या, थोड्या वेळापूर्वी, आत्ता, आज, पुढील वर्षी गेल्या वर्षी, काल

४. कालदर्शक शब्दामुळे घटनेविषयी काय समजते?

५. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?

अधिक सराव करू

१. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पुराव्यांचा उपयोग होतो?

२. इतिहासाच्या पुराव्यांचा कशा प्रकारे पडताळा करता येईल?

३. घरात होऊन गेलेल्या कोणत्याही कार्यक्रम किंवा समारंभाची माहिती मिळव. उदा. कोणतीही कार्यक्रमपत्रिका (लग्नपत्रिका, गृहप्रवेश किंवा इतर कार्यक्रमाची पत्रिका)

४. कार्यक्रमाच्या आठवणी घरच्यांना विचारून त्याच्या नोंदी कर.