♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस पाचवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस पाचवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे व संवाद वाचण्यास सांगावा.

• संवादाचे वाचन करताना पात्रांची संख्या, त्यांची भूमिका, विरामचिन्हे, आवाजातील चढउतार इ. गोष्टी लक्षात घेऊन वाचन करावे हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यावे. • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील प्रश्नांची स्वतःच्या शब्दांत उत्तरे देण्यास सांगावे.

नमुनाप्रश्न:

१) तुम्ही कधी गर्दी असलेल्या रस्त्यावर गेला आहात का ? 

उत्तर :- ………………………………..

२) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? का असते?

उत्तर :- ………………………………..

३) वाहतूककोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात?

उत्तर :- ………………………………..

४) वाहतूककोंडी होऊ नये यासाठी काय काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते?

उत्तर :- ………………………………..

५) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होते?

उत्तर :- ………………………………..

६) हे प्रदूषण कमी होण्यासाठी काय काय करता येईल?

उत्तर :- ………………………………..

• खालील विषयावर संवादलेखन करा.

१) झाड व पक्षी यातील संवाद 

२) पतंग आणि मुलगा यातील संवाद

+ कल्पक होऊ या

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात आलेली वेगवेगळ्या प्रसंगावर आधारित चित्रे शोधण्यास सांगावी.चित्रातील व्यक्ती काय बोलत असतील? याची चर्चा करावी. त्यावर आधारित प्रश्न तयार करून घ्यावेत.

• तुम्हाला शिवाजी महाराज भेटले तर’ अशी कल्पना करा व तुम्ही त्यांच्याशी काय बोलाल ते लिहा.

 विषय –  गणित 

आव्हानात्मक कोपरा खालील उदाहरणे सोडव.

1) अन्नपूर्णा महिला बचतगटाने उडदाचे 3,45,750 पापड तयार केले. निर्माण बचतगटान 5,70,400 पापड तयार केले. सृजनमहिलागटाने 4,50,800 पापड तयार केले. तर

अ) कोणत्या महिला बचत गटाने सर्वांत जास्त पापड तयार केले ?

ब) कोणत्या महिला बचतगटाने सर्वांत कमी पापड तयार केले ?

क) तिन्ही बचतगट गटांनी तयार केलेले पापड उतरत्या क्रमाने लिही.

ड) तिन्ही बचतगट गटांनी तयार केलेले पापड चढत्या क्रमाने लिही.

 विषय –  इंग्रजी 

Day:5

Learning Activity

-Read the given poem loudly with proper pronunciation and recite it.

A Birthday Poem

Just past dawn, the sun stands

with its heavy redhead

in a black stanchion of trees,

waiting for someone to come

with his bucket for the foamy white light, 

and then a long day in the pasture. 

I too spend my days grazing, 

feasting on every green moment till darkness calls, 

and with the others. 

I walk away into the night, 

swinging the little tin bel

lof my name.

Practice Activity

Watch the given poem (Where Go the Boats) on the internet and recite it.

Extension Activity:

Read the poem given in your textbook and try to compose a short poem.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 05

समजून घेऊ या : पर्यावरण, अन्न साखळी.

संदर्भ : इयत्ता पाचवी. पाठ क्रमांक 4 (पर्यावरण संतुलन)

2. तुम्ही परिसरातील आठवडी बाजाराला कधी भेट दिली असेल तर तेथे आढळणाऱ्या भाज्या, फळे, वनस्पती व

प्राण्यांची यादी करुन वहीत नोंदवा.

………………………………………………………………….

3. ‘लक्षात घेऊ या’ मध्ये दिलेल्या अन्नजाळे या चित्राच्या आधारे दोन ते तीन अन्नसाखळ्या तयार करा.

………………………………………………………………….

4. खाली चित्रात दाखवलेली अन्नसाखळी पूर्ण करा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

करून पाहूयात –

१. दिवसभरातील कोणत्या वेळी पक्षी घरट्याबाहेर दिसतात त्याचे निरीक्षण कर.

२. परिसरात कोणत्या ऋतूत जास्त पक्षी दिसतात?

३. परिसरात आढळणाऱ्या पक्षी व प्राण्यांची यादी कर व त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण कर.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. उत्क्रांती म्हणजे काय?

२. प्राणिजाती पुढील पिढ्यांमध्ये कशाचे रूप धारण करतात?

३. उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मांडली?

४. सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

५. अपृष्ठवंशीय सजीव व पृष्ठवंशीय सजीव यांच्यात फरक कोणता?

अधिक सराव करू –

१. नवीन प्राणिजाती हि अधिक उत्क्रांत केव्हा होते?

२. कोणत्या प्रजाती पृथ्वीवर टिकून राहतात?

३. डायनोसॉर वर्गातील प्रजाती नष्ट होण्याची कारणे कोणती?

४. डायनोसॉर वर्गातील प्रजातींची सचित्र माहिती मिळव.