पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सराव करू या

पुढे दिलेल्या विशेषणाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.

1 ) इवलासा

“अगोबाईs !- – बाहुली आणि तिचा पाळणा !आणि दागिने सुद्धा

किती गोड !! “

2 ) विद्यार्थ्यांना आद्यक्षरापासून बनवलेल्या नामांचे तयार पत्ते करण्यास सांगावे. मुलांनी गटात बसून एक-एक पत्ता उचलावा व आठवून वर्णन करणारे शब्द सांगून यादी करावी.

+ कल्पक होऊ या

खालील प्रमाणे वर्गात भाषिक खेळाचा सराव घ्यावा. भाषिक खेळातील अटींमध्ये वर्ग स्तरावर परिस्थितीप्रमाणे बदल करावा. सांगा सांगा लवकर सांगा.

मुलांनी वर्तुळाकार बसावे. एका मुलाने सुरुवात करावी. ‘सांगा सांगा ss लवकर सांगा’ असे दोन टाळ्यांच्या तालावर म्हणावे. नंतर त्याच तालावर प्रश्न विचारावा. याठिकाणीनाम, सर्वनाम , विशेषण कोणत्याही एकाचे दोन उदाहरणे सांगा असे म्हणावे. पुढच्या मुलाने ती उदाहरणे सांगावीत. त्यापुढच्या मुलांनाही वेगळी दोन उदाहरणे द्यावीत.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 14

समजून घेऊ या : विविध राज्यातील वस्त्रे

संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 17 (वस्त्र आपली गरज ) –

अध्ययन निष्पत्ती : शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात. उदा. संतुलित आहारासाठी अन्नपदार्थांची निवड; पदार्थ वेगळे करणे; ऋतुमानानुसार योग्य कपड्यांची निवड; दिशानिर्देशासाठी चुंबकसूचीचा (होकायंत्र) वापर; अतिवृष्टी, दुष्काळ परिस्थितीशी तोंड देण्यासाठी उपाययोजना सुचवतात.

 विषय –  परिसर अभ्यास  

अधिक सराव करू

१. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

१. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये मनोरंजन कसे करत?

२. हडप्पा संस्कृतीत कोणाची देवतांची पूजा करत?

३. हडप्पा संस्कृतीमधील मुलांची खेळणी कोणती होती?

४. प्राचीन नागरी संस्कृतीमधील वाद्यांची नावे लिही.