पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
(2) माध्यमिक परीक्षेत 38,60,049 मुले व 47,08,204 मुली प्रवेशित झाली, तर एकूण किती विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली ?
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 10
समजून घेऊ या : अन्न आणि सूक्ष्मजीव अन्न टिकवण्याच्या पद्धती संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 13 (अन्न टिकवण्याच्या पद्धती)
अध्ययन निष्पत्ती: आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागविण्याची (पाणी, अन्न इत्यादी)
प्रक्रिया स्पष्ट करतात.
सराव करु याः
1. कुरकुरे, बटाटे, वेफर्स यांच्या हवाबंद पाकिटांवर दिलेले अन्नपदार्थ, पॅक केल्याची तारीख इत्यादी तपासा व त्यांची नोंद घ्या.
उत्तर – …………………………………………………..
4. कैरीचे लोणचे बनविण्याची कृती आपल्या आईकडून माहीत करून घ्या व त्यातील प्रत्येक अन्नपदार्थांचे कार्य जाणून घेऊन नोंद ठेवा
उत्तर – …………………………………………………..
विषय – परिसर अभ्यास
१. वरील चित्राचे निरीक्षण कर. चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची यादी कर.
२. यादीतील वस्तू आजही घरात वापरल्या जातात का? वापरत असतील तर त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो?
३. घरातील विविध भांडी व वस्तूंमध्ये कोणत्या धातूंचा वापर झाला आहे ते निरीक्षण कर. तांबे, स्टील, लोखंड यामध्ये वर्गीकरण कर.
४. नजीकच्या काळात कुंभारकामाचे निरीक्षण कर. कुंभारकामासाठी वापरल्या जाण्याऱ्या चाकाच्या रचनेत कोणकोणते बदल झाले त्याची माहिती मिळव.
५. चाकाचा शोध लागता नसता तर काय झाले असते? किमान पाच ओळी लिही.
प्र. २. उत्तरे लिही.
१. ताम्रयुगात कशाचा शोध लागला?
२. चाकाचा उपयोग सर्वप्रथम कोणी केला?
३. ताम्रयुगात गावांचा विस्तार कसा झाला?
४. वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे का गरजेचे होते?
अधिक सराव करू –
१. मानवाने हत्यारे व वस्तू बनविण्यासाठी सोन्याऐवजी तांबे या धातूला प्राधान्य का दिले?
२. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिही.
i. अ. तांबे ब. सोने क. लोखंड
ii.अ. ताम्रयुग ब लोहयुग क. अश्मयुग
३. चाकाच्या उपयोगामुळे व्यापारात कशी प्रगती झाली असावी? ते लिही.
४. पुढे दिलेल्या चित्रात चाकाचे बदलते स्वरूप दिले आहे. चाकाच्या या बदलत्या स्वरूपामुळे वाहतुकीवर काय परिणाम झाला असावा?