पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

+ जाणून घेऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखादा प्रसंग / घटना /कृतीवर आधारित निरनिराळे प्रश्न विचारावे, विचारलेल्या प्रश्नांशी संबंधित विद्यार्थ्याला त्याचे अनुभवकथन करण्यास सांगावे. शिक्षकांनी योग्य तेथे मार्गदर्शन करावे.

उदा. १. आपल्या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्यदिन

२. अचानक आलेला पाऊस

+ सक्षम बनू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनुभव कथन करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे ते स्पष्ट करावे. शिक्षकांनी स्वतः एक अनुभवकथन करून दाखवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खेळ, सण, दैनंदिन जीवनातील प्रसंग, शालेय उपक्रम यांसारखे विषय देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतःच्या शब्दांत ५/६ वाक्यात आपले अनुभव कथन करण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करावे.

+ सराव करू या

शिक्षकांनी निरनिराळे विषय असणाऱ्या चिठ्या तयार कराव्यात. प्रत्येक विद्यार्थ्यांस एक चिठ्ठी उचलून त्यात असलेल्या विषयावर ५/६ वाक्ये बोलण्यास सांगावे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करावे. विद्यार्थ्यांना एकमेकांचे अनुभव गटात सांगण्यास सांगावे.

+ कल्पक होऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करण्यास सांगावे.

१. तुम्ही एकट्याने केलेला प्रवास याविषयी तुमचे अनुभव सांगा.

२. तुमची आत्तापर्यंत कधी फजिती झाली आहे का ? त्या प्रसंगाचा अनुभव सांगा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 09

समजून घेऊया : वातावरण, हवा हे अनेक वायूंचे मिश्रण

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 9, हवा

अध्ययन निष्पत्ती : निरीक्षण / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. हवा)

प्र. 3) खाली काही वायूंबद्दल विशेष माहिती दिली आहे त्यावरून त्या वायूचे योग्य नाव ओळखून लिहा.

1) हवेतील सर्वात मोठा भाग या वायूने व्यापलेला आहे.  …………………………..

(2) श्वसनासाठी या वायूचा उपयोग होतो……………………………

3) वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हा वायू वापरतात. …………………………..

प्र. 4) खाली एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली आहे तर त्यात खाली कंसात दिलेल्या वायूंचे नाव त्यांच्या दिलेल्या रंगासमोर लिहायचे आहे. (नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड, इतर वायू)

1 ) आकाशी रंग …………………………..

2) हिरवा रंग : …………………………..

3) निळा रंग : …………………………..

4) नारिंगी रंग : …………………………..

 विषय –  परिसर अभ्यास  

उत्तरे सांगा.

१) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकुमत गाजवत होत्या?

२) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या?

३) शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले?

४) तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?

स्वराज्याचे तोरण बांधले:- हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र.२५ ते २७ वर आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व…………………………. या परगण्यांची जहागीर होती?

(इंदापूर, सासवड, वेल्हे) या परगण्यांची जहागीर होती?

२) शिवरायांनी (सिंहगड, शिवनेरी, तोरणा) ……………………जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले.

३) स्वराज्याची पहिली राजधानी ……………………हि सजली. (राजगड, रायगड, प्रतापगड )

उपक्रम : तोरणा किल्ल्याविषयी अधिक माहिती इंटरनेटवर मिळवा व येथे लिहा..