♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस नववा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस नववा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या..

• शिक्षकांनी समूहदर्शक शब्द सांगावे व त्याप्रमाणे इतर समूहदर्शक शब्द सांगण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. जसे- पक्षांचा थवा, आंब्यांची राई, केसांचा झुबका, फुलांचा गुच्छ, पुस्तकांचा गठ्ठा, वस्तूंचा ढीग.

शिक्षकांनी शब्दसमूहाबद्दल वापरले जाणारे शब्द सांगावेत व त्याप्रमाणे इतर शब्द सांगण्यास त्यांना प्रेरित करावे. जसे- मोठा भाऊ थोरला कधीही विसर पडत – नाही असे – अविस्मरणीय,

न जिंकता येणारे अजिंक्य, रत्नांची ओळख असणारा – रत्नपारखी

+ सक्षम बनू या..

प्रत्येक समूह दर्शविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शब्द वापरले जातात अशी उदाहरणे विद्यार्थ्यासमोर मांडावीत आणि त्यासाठी समूहदर्शक शब्द शोधण्यास सांगावे. उदा. चोरांचा समूह – टोळी, वाहनांचा समूह – ताफा, खेळाडूंचा समूह संघ

खालील प्रमाणे वाक्ये देऊन शब्दसमूहाबद्दल एका शब्दाचा वापर करून वाक्य पुन्हा सांगण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे.

उदा. प्र. तो क्षण कधीही विसर पडणार नाही असा होता. 

        उ. तो क्षण अविस्मरणीय होता.

सराव करू या..

• शिक्षकांनी विविध समूहदर्शक शब्द विद्यार्थ्यांना देऊन ते कोणत्या समूहास प्रदर्शित करतात याचा सराव घ्यावा. जसे – कळप – गुरांचा, मेंढ्यांचा, गायींचा.., जुडी – पालेभाज्यांची, गवताची

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शब्दसमूहाबद्दल वापरले जाणारे शब्द विचारून त्यांचा विस्तार करण्यास सांगावे. जसे – असंख्य – संख्येत मोजता येणार नाही इतके,

शिलालेख. – दगडावर कोरलेला मजकूर

अनुज – लहान बंधू

+ कल्पक होऊ या..

समूहदर्शक शब्द व शब्दसमूहाबद्दल वापरले जाणारे शब्द यांचा शब्दसंग्रह करावा.

परिसरातील विविध समूहांसाठी वापरले जाणारे शब्द शोधावेत.

• शब्दसमूहाबद्दल वापरले जाणारे शब्द वापरून गोष्ट, कविता तयार करण्याचा प्रयत्न करा.

 विषय –  गणित 

संबोध कोपरा

यशने त्याच्या वाढदिवसाला प्रत्येक मित्रमैत्रिणींला २-२ फुगे दिले.

• सदू: एकूण किती फुगे झाले?

राजू: प्रत्येकाला २ फुगे असे चार जणांचे मिळून ८ फुगे झाले. रमा: एकूण चार जणांचे फुगे म्हणजेच २ फुगे ४ वेळा घेऊन केलेली बेरीज होय.

२+२+२+२=८ 

ताई: २+२+२+२ हे २x४ असे लिहितात. 

म्हणजेच ८ ही संख्या २ आणि ४ चा गुणाकार आहे.

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 09

संदर्भ : इ. 3री, पाठ 9, पाणी नक्की कोठून येते ?

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.

सराव करू या :

1) कोणकोणत्या पद्धतीने पावसाचे पाणी साठविता येईल?

उत्तर – …………………………………

2) तुम्ही कोणत्या कामांसाठी पाण्याचा वापर करता?

उत्तर – …………………………………

3) फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला, तर इतर सजीवांचे काय होईल? त्यावर उपाय सुचवा.

उत्तर – …………………………………

4) सर्वांना पाणी समान मिळण्यासाठी काय कराल?

उत्तर – …………………………………

विषय -परिसर अभ्यास भाग

अध्ययन अनुभव

आपल्या सभोवताली विविध ठिकाणी पाणी असते त्या पाण्याची गरज कोठे कोठे पडते हे आपणा सर्वांना माहीत आहे.

१. पाण्याचा काटकसरीने वापर करा

उत्तर – …………………………………

२. पक्षांना तहान लागली की ती कुठे जाऊ लागतात ते पहा

उत्तर – …………………………………

३. आणि स्वच्छ ठेवायला शिका

उत्तर – …………………………………

४. पाण्याचे प्रमाण असणारी फळे कोणती आहेत त्यांची यादी करा

उत्तर – …………………………………

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

उत्तर – …………………………………

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1. पान व त्याचे उपयोग सांगा?

उत्तर – …………………………………

2. कोणत्या दिवसात आपणास पाण्याची जास्त गरज असते?

उत्तर – …………………………………

3. जंगली प्राण्यांना पाण्याची गरज असते का ते सांगा ?

उत्तर – …………………………………

अधिक सराव करू पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडव.

उत्तर – …………………………………