पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस बाविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम बनू या
शिक्षकांनी वरीलप्रमाणे विविध प्रकारच्या शब्द शोधपाठ्या तयार करून त्या विद्यार्थ्यांना शोधण्यास द्यावे .त्याद्वारे वेगवेगळ्या शब्दांचे वाचन होईल. विशेषतः वाचनात मागे पडलेल्या मुलांसाठी याचा जास्तीजास्त सराव शिक्षकांनी घ्यावा. उदा. फुलांची नावे, प्राणी-पक्ष्यांची नावे, उलट अर्थी शब्द, म्हणी
+ सराव करू या
शिक्षकांनी इ.४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं. ६० वरील शब्दशोध पाटी पाहण्यास सांगावे. व त्यात लपलेल्या म्हणी शोधून शोधलेल्या म्हणी वहीत लिहिण्यास सांगावे.
+ कल्पक होऊ या
शिक्षकांनी मुलांना फळांची नावे लपलेली शब्द शोधपाटी तयार करण्यास सांगावी.
विषय – गणित
थोडी उजळणी
दिनदर्शिकेच्या निरीक्षणाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे शोध,
१) शाळेची सहल २९ डिसेंबर पासून ते ३ जानेवारी पर्यंत होती तर सहल एकूण किती दिवस होती ?
२) मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ तारखेचा बुधवार असल्यास त्याच्या पुढच्या आठवड्यात येणाऱ्या शुक्रवारी तारीख कोणती असेल ?
३) शाळेचे स्नेहसंमेलन ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असे होते तर एकूण किती दिवस स्नेहसंमेलन आयोजित करण्यात
आले ?
सोडवून पाहू…
सन २०२० च्या फेब्रुवारी महिनाच्या १२ तारखेपासून ते मार्च महिन्याच्या ५ तारखेपर्यंत गणेशने दूध डेअरीतून दूध
आणले तर त्याने किती दिवस दूध आणले ?
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 22
समजून घेऊया : जुन्या व आधुनिक वाहतूक व संदेशवहनाची साधने, व त्यांचे फायदे संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-22, वाहतूक व संदेशवहन
अध्ययन निष्पत्ती : भूतकाळातील आणि सध्याच्या वस्तू आणि कृती यामधील फरक सांगतात. (उदा. परिवहन, चलन,
घरे, साहित्य, साधने, कौशल्य इ.)
प्र. 4) खाली दिलेल्या साधनांचा जलद ते संथ असा क्रम लावा. बैलगाडी, मानव, मेट्रो, विमान, गाढव
प्र. 5) तुम्हाला संदेशवहनाची साधने महत्वाची वाटतात का? का ते लिहा.
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया:- उत्तरे सांगा.
१) मांजराची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का?
२) सर्वच कुत्र्याचा रंग सारखाच असतो का?
३) कोण कोणते प्राणी पिल्लांना जन्म देतात?
प्राण्यांचा जीवनक्रम :- हा पाठ्यांश (परिसर अभ्यास भाग १) या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्र. १.२,३,४,५ वर आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) फुलपाखराच्या वाढीच्या कोणत्या चार अवस्था आहेत?
२) फुलपाखरूला किती पाय असतात?
उपक्रम :
1) बिबळ्या कडवा फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा.
2) इतर फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करा आणि वहीत चिटकवा खालील कोड स्कॅन करून पाठाविषयी अधिक माहिती मिळवा.