पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस बाविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस बाविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती

१) भाषेतील बारकावे नियम इत्यादीचा विचार करून स्वताची भाषा तयार करतात आणि त्याचा आपल्या लेखनात समावेश करतात.

२ ) पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टी/घटना मुद्दे याना स्वतःच्या भाषेत कथन करतात, लिहितात.

+ जाणून घेऊ या

खाली चार चित्रे दिली आहेत त्याचा सहसंबंध लावून गोष्ट / कथा तयार करण्यास सांगतात.

चित्रे ओळखण्यास सांगावे. आपण चित्राविषयी काय लिहू शकतो यावर चर्चा करून प्रथम त्याचे लेखन करून घेतात.

+ सक्षम बनू या

वरील चित्राचा एकमेकाशी सहसंबंध जोडून कथेचे लेखन करण्यास सांगतील. चित्र कोणती आहेत. चित्राचा काही सहसंबंध जोडता येईल का ? चित्राविषयी माहिती सांगा ? अशा विविध प्रश्राद्वारे कथालेखानासाठी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील कथा लिहून घेतील .कथेचे वाचन घेतील.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 22

समजून घेऊया: रोगप्रतिबंधक, लसीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा संदर्भ : इयत्ता पाचवी प्रकरण 23 संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

अध्ययन निष्पत्ती : स्वच्छता, आरोग्य/ कचरा /आपत्ती आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण (भूमी, इंधन, जंगल, इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि मागास व वंचिताविषयी संवेदनशीलता दाखवतात.

सराव करु या:

1. खालील रोगावर प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.

अ. मलेरिया:

ब. कॉलरा:

क. पोलिओ

ड. क्षयः

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. अ. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रोग प्रसार होत नाही.

ब. लसीकरण हा रोग प्रतिबंधाचा एक उत्कृष्ट उपाय आहे.

क. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात.

4. इंटरनेटच्या मदतीने तसेच घरातील मोठ्या व्यक्तींसोबत चर्चा करून कोविड 19 या रोगाची खालील मुद्याच्या आधारे माहिती लिहा.

अ. रोगाचे नाव :

ब. रोगजंतूचेनाव:

क. प्रसाराचे माध्यम :

ड. उपाय व उपचार:

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन अनुभव / कृती- इयत्ता पाचवी, विषय परिसर अभ्यास १, प्रकरण: नकाशा: आपला सोबती काय समजले? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

अधिक माहिती येथून मिळेल https://diksha.gov.in/dial/55X11C

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. प्राकृतिक रचना नकाशात दाखविण्याच्या पद्धती कोणत्या आहेत?

२. नकाशात भुरूपे दाखविण्याची समोच्च रेषा पद्धत वापरून समान उंचीवरील ठिकाणांचे बिंदु रेषेने जोडा.