पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
देण्यास सांगावे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील मुद्दे गोष्ट लेखनासाठी फळ्यावर लिहून द्यावेत. शिक्षकांनी पुढील मुद्द्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना गोष्ट लिहिण्यास व ती लिहून झाल्यावर गोष्टीला योग्य असे नाव
चिंगी -डिंक गोळा करण्यासाठी जंगलात जाते रस्ता चुकते रस्ता सापडत नाही-अधिक घनदाट भाग-सायंकाळ घराची आठवण व आईबाबांची काळजीचा विचार घाबरते-वनखात्याचे कार्यालय- वनकर्मचारी घरी आणून सोडतात आईबाबा आनंदी.
वरील मुद्द्यांवर आधारित विद्यार्थ्यांकडून गोष्ट लिहून घ्यावी. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी वाचाव्यात व विद्यार्थ्यांना मुद्द्यांवर आधारित गोष्ट लिहिता येते की नाही हे त्यावरून जाणून
घ्यावे.
सक्षम बनू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोष्ट लिहिण्याविषयी व ती लिहिताना मुद्द्यांच्या वापरासंबंधी •पुढीलप्रकारे मार्गदर्शन करावे.
1) मुद्द्यांमध्ये दिलेल्या व्यक्तींचे सविस्तर वर्णन करावे (नाव, बाह्यरूप, स्वभाव)
2) मुद्द्यांमध्ये स्थळ (निसर्ग, गाव, बाजार, शाळा, बाग वगैरे) दिले असेल तर त्या स्थळाचे वर्णन
करावे.
3) मुद्द्यांवरून गोष्टीची मध्यवर्ती कल्पना निश्चित करावी
4) गोष्ट पूर्ण होण्यासाठी संबंधित पात्रांची निवड करावी, पात्रे मर्यादित असावेत.
मुद्द्यांचे बारकाईने निरिक्षण करून घटनेचा क्रम निश्चित करावा. 5)
6 ) घटनेची सुरुवात- समस्या- समस्येची सोडवणूक समाधानकारक शेवट असा सर्वासाधारण
क्रम असावा.
7) गोष्टीला अनुरूप नाव द्यावे.
(थोडक्यात :-कथेची सुरुवात कथेचा मध्य कथेचा शेवट
(कथेला या सर्व बाबी असतात. तर या प्रत्येक बाबीचा विचार करत असताना कथेची भाषा, पात्र,प्रसंग, कथेमध्ये एक समस्या निर्माण होते ती हळूहळू सुटत जाते. आणि शेवट होतो अशी कथा आम्हाला लिहायची आहे. त्यासाठी खालील मुद्यांच्या आधारे आपण कथा लिहू शकतो.)
गोष्टीचा मध्य/समस्या/ अडचण
अडचण/सुटण्यास सुरुवात, उपाय सापडणे
गोष्टीची सुरुवात (स्थळ व पात्राचे वर्णन) समस्या सुटणे गोष्टीचा शेवट
सराव करू या
शिक्षकांनी पुढील मुद्दे फळ्यावर थोडक्यात लिहून ग्राफ फळ्यावर काढावा व विद्यार्थ्यांना गोष्ट लिहिण्यास सांगावी..
शेतकरी- आंब्याची बाग लावली- शेळ्या-मेंच्या आंब्याची झाडे खाऊ लागली-बागेला निवडुंगाचे कुंपण- बागेला संरक्षण-बाग मोठी झाली खूप आंबे खूप उत्पन्न शेतकऱ्याचा मुलगा मोठा झाला बाग व बागेचा जमाखर्च मुलगा मूर्ख व अविचारी निवडुंगाचा उपयोग नसल्याने निवडुंग तोडतो- बागेतील झाडांची शेळ्या मेळ्या व लोकांकडून फळांची चोरी व नासधूम उत्पन्न कमी-चूक कळते
+ कल्पक होऊ या
1) शिक्षकांनी पुढील शब्दांच्या आधारे विद्याथ्र्यांना गोष्ट लिहायला सांगावी.
(बाग, डबा, शाळा, संध्याकाळी)
2) शिक्षक एका गोष्टीची सुरुवात फळ्यावर लिहून देतील व यावरून गोष्ट पूर्ण करण्यास •सांगतील धान्याची पोती भरलेली बैलगाडी घेऊन खंडेराव बाजाराच्या गावाला निघाले होते. गाव मागे टाकून ते एका चढावर पोचले आणि अचानक बैल जागीच थांबले. काही केल्या पुढे जाईनातच…
विषय – गणित
१. एका आयताकार जलतरण तलावाची एक बाजू ४५ मीटर व लगतची दुसरी बाजू १०० मीटर असल्यास त्या तलावाची परिमिती किती असेल?
२. एका घराला चौरसाकृती कुंपण आहे. कुंपणाची एक बाजू १४ मीटर लांबीची आहे. तर घराच्या कुंपणाची परिमिती किती ?
३. एका चौरसाची परिमिती ४० सेमी आहे, तर त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल ?
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 19
समजून घेऊया : शिकण्याचा समान अधिकार
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 19, माझी आनंददायी शाळा अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समावानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक / समकालीन उपक्रम आणि खेळ समजून घेतात, भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात.
प्र. 1) वाक्यातील अयोग्य पर्याय खोडा.
अ) एकमेकांना मदत / याद केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते. ब) शाळेत आपल्याला वेगवेगळी / एकसारखी मुले-मुली भेटतात.
प्र. 2) विशेष गरजा असलेली मुले-मुली तुम्हास भेटली, तर तुम्ही काय कराल, ते लिहा.
प्र. 3) विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या योजना / सुविधा शासन पुरवते? शिक्षकांशी चर्चा करून लिहा.
प्र. 4) मुलींचे शिक्षण कोणकोणत्या कारणाने रखडते?
प्र. 5) शिकण्याचा समान अधिकार ह्यावर घोषवाक्य बनवा. वर्गात ही घोषवाक्ये भिंतीवर चिकटवा.
प्र. 6) तुमच्या वर्गात दुसऱ्या गावाहून आलेल्या एका मुलाने नव्याने प्रवेश घेतला आहे. त्याला त्याच्या आधीच्या
शाळेविषयी माहिती विचारा. शिक्षकांना लिहून पाठवा.
विषय – परिसर अभ्यास
१ शिवरायांना गोवळकोंडा येथे भेटीचे आमंत्रण कोणी दिले?
२) शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय होते ?
३) व्यंकोजीराजे यांच्याकडे कुठली जहागीर होती?
व्यंकोजीराजांची भेट :-हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग – २) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ६१ व ६२
वर आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली??
२) शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले?
.. ३) शिवरायांचे निधन केव्हा झाले?
उपक्रम- शिवराय व व्यंकोजीराजे यांच्या भेटीचे संवाद तयार कर.