पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
अध्ययन निष्पत्ती :- विविध प्रकारच्या रचना / मजकूर (उदा. वर्तमानपत्र, बालसाहित्य, जाहिराती) समजपूर्वक वाचल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न विचारतात, आपले मत देतात, शिक्षक मित्र यांच्याबरोबर चर्चा करतात व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंडी व सांकेतिक भाषेत देतात.
• पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर मजकुराचे (बालसाहित्य, वर्तमानपत्रातील ठळक शीर्षक, प्रसिद्धी फलक इत्यादी ) यांचे समज पूर्वक वाचन करतात.
+ जाणून घेऊया
शिक्षकांनी खाली दिलेल्या नमुन्याच्या मदतीने, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून जाहिरातीचे वाचन करून घ्यावे. त्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करावी व त्यावर प्रश्नोत्तरे घ्यावीत. (उदा. दुकानाचे नाव काय आहे? कशाची जाहिरात आहे ?) त्यावरून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जाणून घ्यावा.
आपले उत्पादन, माल किंवा वस्तू या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात केली जाते. त्यामुळे जास्त लोकांना त्या वस्तूंची माहिती मिळते व ते त्या वस्तू. उत्पादने किंवा माल खरेदी करतात. यामुळे व्यावसायिकांना जास्त पैसे मिळण्याचा फायदा होतो.
शिक्षकांनी विविध प्रकारच्या विविध आशयाच्या जाहिरातींचे नमुने विद्यार्थ्यांना दाखवावे व जाहिरात संकल्पनेचे दृढीकरण करून घ्यावे उदा. पुस्तके, फर्निचर, इलेक्ट्रोनिक वस्तू, कपडे, शिबिरे, मनोरंजन इ. त्यावरून खालील काही कृती करून घ्याव्या.
+ सराव करूया
• १. जाहिरातींचे वर्गीकरण
२. जाहिरातीतील माहितीचे वाचन व आकलन
३. मुलांना गटात विभागून जाहिरातीवर आधारित प्रश्नोत्तरे ( हे करताना मुलांची विभागणी योग्य होईल याकडे अधिक लक्ष द्यावे)
4. कल्पक होऊया
मुलांनो, दिवाळीचे कंदील आणि भेटकार्डे विकण्यासाठीची जाहिरात तयार करून वहीत
लिहा!
विषय – गणित
सराव कोपरा
/ तू कोणकोणत्या वस्तूचे वजन (वस्तुमान) मापन करताना पाहिले आहे?
तू वजन करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग होताना पाहिले आहे, त्याची यादी करा.
/ तू वेगवेगळ्या ठिकाणी विविध वस्तूंची वजने करण्यासाठी वापरलेल्या तराजूंची नावे लिही.
/ तू वजन (वस्तुमान) मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरणार ?
. सोडवून / करून पाहू…
● मला आपल्या घरात मोठ्या व्यक्ती खालील परिमाणात कोण कोणत्या वस्तू विकत आणतात किंवा विक्री
करतात त्यांची यादी तयार कर.
१) ग्रॅम मध्ये =
२) किलोग्रॅम मध्ये
३) क्विंटल मध्ये =
टाकाऊ वस्तूपासून तराजू बनव.
• अध्ययन निष्पत्ती / हे मला समजले
वस्तूचे साध्या तराजूच्या सहाय्याने ग्रॅम व किलोग्रॅम ही प्रमाणित एकके वापरून वजन करतात.
विषय – इंग्रजी
1. Title:-Action Words
2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):
Listen attentively for various purposes.
Tell the words related to a given word or picture.
3. Learning Activity/Experience:
Listen and repeat the words
Do the action after your teacher/facilitator.
Blow,break,buy,call,catch,clean,climb,close,cook,count,cut,drop,drive,eat,fill,find, finish, fold,get, give, grow,help,hold,lift,make,move,open, paint, peel, pick, pull, push, put, read, ride, rub, sell, shake, share, show, smell, start, top, take, throw, wash, wipe, write.
Name the following pictures.
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 19
समजून घेऊ या अन्न शिजवण्याच्या पद्धती
संदर्भ : इ. 3री, पाठ 14 स्वयंपाकघरात जावू या…
अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.
लक्षात घेऊया :
लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात. भाज्या, फळे आणतात. अंडे, मांस, मासे आणतात. त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार
करतात.
सराय करू या :
1. सगळेच पदार्थ उष्णता देऊन तयार केले जात नाहीत. काही पदार्थ कच्चे खाल्ले जातात. असे पदार्थ कोणते ते सांगा. त्यांची चित्रे जमवून वहीत चिकटवा किंवा त्यांची चित्रे काढा.
……………………..……………………..
2. पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याच्या कोणत्या पद्धती वापरतात ? ढोकळा, आमटी, करंजी, थालीपीठ, भाकरी, रस्सा
……………………..……………………..
3. दुधापासून पनीर कसे तयार करतात, याची माहिती मिळावा व वहीत लिहा.
……………………..……………………..
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात
आणि व्यक्तीमधील नातेसंबंध
१. सार्वजनिक सोई व सुविधा यांची यादी कर.
२. सार्वजनिक सुविधा आपण जबाबदारीने वापर.
३. पूर्वीच्या काळी कोणत्या सार्वजनिक सुविधा होत्या त्यांची यादी कर.
आवश्यक साहित्य- सार्वजनिक सुविधांचे चित्र
अध्ययन अनुभव –
आपले कुटुंब हे आपले घर असते घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते या सार्वजनिक जीवनात आपणास विविध सोयी-सुविधा उपलब्ध होत असतात.
१. आपल्याला मिळणाऱ्या सोई व सुविधा शोध.
२. सार्वजनिक सेवा केंद्रातून कोणती सुविधा मिळेल ते पहा.
३. सार्वजनिक सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील त्यांची यादी करा.
काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले? काय शिकण्यास मिळाले ते लिहा
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. पोलीस चौकीतून कोणती सुविधा मिळते?
२. आपल्या घरचे पाणी संपले तर आपण काय कराल ?
३. सार्वजनिक सुविधा वापरतांना कोणती काळजी घ्यावी?