पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील शब्द शब्दकोशात शोधायला सांगावेत.
फळकूट• कांबट्या• वाकळ • फैनाबाज• ओढाळ • हालहवाल • बळीराजा• जित्राबं• हेळसांड• वेसण
+ सक्षम बनू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शब्दकोशामधून शब्द कसे शोधावेत याचे मार्गदर्शन करावे. . • शब्दकोशात शब्दांची मांडणी ही अकारविल्हेनुसार असते.
• मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ या अक्षरक्रमाने आहेत. त्यांचा अनुक्रम लक्षात शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी केलेली असते.
• यासाठी क्रमवार मुळाक्षरे व बाराखडी ही लक्षात घ्यावी लागते.
• शिक्षकांनी फळ्यावर काही शब्द द्यावेत. विद्यार्थी शब्दकोशातील शब्द पट्कन शोधतात का ते
पाहावे.
+ सराव करू या • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज दहा शब्द शब्दकोशात शोधून ते माझा
शब्दसंग्रह या वहीत लिहिण्यास सांगावे.
+ कल्पक होऊ या विद्यार्थ्यांना माझा शब्दसंग्रह यावहीत शब्दांचे संकलन करताना अकारविल्हेनुसार शब्द लिहिण्यासाठी पानांचे वर्गीकरण करण्यास सांगावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 19
समजून घेऊया : श्वसन, अन्ननलिका, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था संदर्भ : इयत्ता पाचवी, पाठ क्रमांक 21. कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये.
अध्ययन निष्पत्ती : प्राण्यामधील असाधारण क्षमता (दृष्टी, गंध, ऐकणे विद्रा, आवाज इत्यादी) व त्यांचे प्रकाश आवाज व अन्न यांना प्रतिसाद देतात. निरीक्षणे अनुभव माहिती याची सुनियोजित पद्धतीने नोंदी करतात.
2. वेगळा शब्द ओळखा. कारण लिहा
अ. नाक, फुफ्फुसे, हृदय, श्वासनलिका, श्वासपटल.
ब. तोंड, ग्रासिका, जठर, चेतातंतू, मलाशय
3. खालील वाईट सवयी चे मानवी आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात?
अ. धुम्रपानः
ब. मद्यपानः
4. बरेच पालक जेवताना मुलांना बोलू नका असे सांगतात. आपण खाण्याच्या दरम्यान बोललो तर काय होईल?
विषय – इतिहास ना.शास्त्र
अध्ययन अनुभव / कृती – संदर्भ:- इयत्ता पाचवी, विषय: परिसर अभ्यास १, प्रकरण : पृथ्वी व जीवसृष्टी काय समजले? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. पृथ्वीच्या भोवती वातावरणाचे किती थर आहेत त्यांची नावे लिहा.
२. वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात?
३. ओझोन वायुचे संवर्धन तुम्ही कशा प्रकारे कराल?
४. वातावरणाचे थर दर्शविणारी सुबक आकृती काढा
अधिक सराव करू –
वातावरणाच्या विविध थरांविषयी अधिक माहिती मिळवा.