♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न : १) ही जाहिरात कशा संदर्भात आहे ?

२) उद्घाटन समारंभ केव्हा आहे ?

३) प्रदर्शनाचे उद्घाटन कोण करणार आहे ?

४) प्रदर्शनाचा कालावधीव वेळ किती आहे ?

५) प्रदर्शनाचे ठिकाण कोणते ?

1) वरील चित्र कोणत्या ठिकाणचे आहे ?

2) चित्रात काय काय दिसत आहे ?

3) सूचनाफलकावर कोणत्या सूचना दिल्या आहेत ?

4) किल्ला चढताना सुरवातीलाच सूचना का दिल्या आहेत?

5) चित्रात काय काय दिसत आहे ?

6) सूचनाफलकावर कोणत्या सूचना दिल्या आहेत ?

7) किल्ला चढताना सुरवातीलाच सूचना का दिल्या आहेत?

+ सक्षम बनू या किल्ला पाहायला येणाऱ्यांना सूचना देण्याची गरज आहे का ? व का? – कृती- १ जाहिरात ही संकल्पना दृढ होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. पुढील माहिती द्यावी.

आपला माल किंवा वस्तू, प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात केली जाते. जाहिरातीमुळे जास्त लोकांना वस्तूची माहिती मिळते. त्यामुळे वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात विकली जाते. जाहिरातीत वस्तू किंवा प्रदर्शनाची सगळी माहिती दिलेली असते.

संकल्पनेचे दृढीकरण करून घ्यावे. उदा. कपडे, फर्निचर, पुस्तके, शिबिरे, विविध प्रकारचे क्लासेस इ.

कृती- २

● शिक्षकांनी वरील सूचनाफलकाचे प्रकट वाचन करावे.

मुलांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून सूचना फलकाविषयी चर्चा करावी • सूचना फलक कोठे कोठे आढळून येतात. हे विद्यार्थ्याना चर्चेद्वारे सांगावे

• सूचना फलकाची गरज का असते, हे स्पष्ट करावे.

वेगवेगळ्या सूचना फलकांचे नमुने विद्यार्थ्यास वाचनास उपलब्ध करून द्यावेत.

* सराव करू या

कृती- १ शिक्षकांनी वर्तमानपत्र मासिके यातून मिळणाऱ्या जाहिरातीचे नमुने विद्यार्थ्यांना देऊन

पुढील कृती करून घ्याव्यात.

१) जाहिरातीचे वर्गीकरण करून घेणे. उदा. वस्तूची.

२) मुलांनी शाळेत बनविलेल्या पणत्या व उटणे विकण्यासाठी ची जाहिरात तयार करण्यास सांगावे.

३) मुलांची गटात विभागणी करून जाहिरातीवर प्रश्नोत्तरे

कृती- २ १) शिक्षकांनी ३-४ मुलांचे गट करून गटात पुढील प्रकारातील सूचनांच्या पट्ट्या करून वाचण्यास द्यावे गटातील इतर मुलांनी वाचलेल्या सूचनेवर आधारित प्रश्न विचारून एकमेकांत चर्चा करावी. 

२) तुमच्या शाळेत कोणकोणत्या सूचनांचे फलक लावता.

कृती-१

१ ) शिक्षकांनी विद्यार्थ्याशी मुलभूत चर्चा करून जाहिरात बनविण्यास प्रवृत्त करावे. उदा.

प्रदर्शनाची क्लासेसची

२) जाहिरातीचे वाचन व आकलन

शिक्षकानी मुलांना इ.४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं ६९ वरील सूचना फलकाचे वाचन करण्यास सांगावे . शिक्षकांनी सूचना फलकावर आधारित पुढील प्रश्न विचारावे किल्ला पाहायला

येणाऱ्यांना सूचना देण्याची गरज आहे का ? व का?

कृती- २

१)सूचना फलक कोठे कोठे असतात त्या सूचना वाचा व वहीत लिहा.

२) तुमच्या शाळेत कोणकोणत्या सूचनांचे फलक लावता येतील ते वहीत लिहा व लिहिलेल्या

सूचनांचे मोठ्या अक्षरात फलक करून शाळेत लावा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Practice:

1. Sing poem aloud.

2. Tell the names of things we get from market.

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement :

✓ Make the list of following things –

✓ Animals, birds, flowers, fruits, vegetables, colours etc.

✓ List the household things.

✓List the things from classroom.

✓ List the things from school laboratory.

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 13

समजून घेऊया : मुख्य दिशा, उपदिशा, दिशाचक्र, प्रमाणबद्धता संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 13, दिशा व नकाशा

अध्ययन निष्पत्तीः नकाशाचा वापर करून वस्तू /ठिकाणे यांच्या खुणा / स्थान ओळखतात व जवळच्या खुणेवरून शाळा / शेजार यांच्या दिशांचे मार्गदर्शन करतात.

प्र. 2) ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो?

प्र. 3) वेहा व रश्मी यांच्या घरातील अंतर 10 किलोमीटर (किमी) आहे. नकाशा काढण्यासाठी प्रमाण 1 सेमी = 1 किमी असेल, तर नकाशामध्ये ह्या दोघींच्या घरांमधील अंतर किती असेल ते सांगा.

प्र. 4) वहीच्या कागदावर फुटपट्टीच्या साहाय्याने अंतर काढून पहा.

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया :

१) शिवरायांच्या किल्ल्यांची नावे लिही.

२) पुणे जिल्हात कोणते किल्ले आहेत?

३) शिवरायांचा पुण्यात कोणता महाल आहे ?

शायिस्तेखानाची फजिती:-हा पाठ्यांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग – २) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ४२ ते ४४

वर आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्यात आला?

२) शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले?

.. ३) शायिस्ताखान खिडकीवाटे का पळू लागला?