♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती स्वतःच्या इच्छेने किंना शिक्षकाने ठरविलेल्या कृतीअंतर्गत जागरुकलेने व स्वनियंत्रण पद्धतीने लेखन मजकुराचे वाचन व लेखन करतात

+ जाणून घेऊ या

एकाच शब्दातील अक्षरांपासून अनेक शब्द बनविता येतात. असे शब्द मुलांना बनवून दाखवावेत.

उदा. ‘वातावरण’ या शब्दामधील अक्षरे घेऊन

वार, वरण, वाण, रण, वर, ताव वगैरे शब्द तयार होतात. असा कोणताही शब्द घेऊन मुलांच्या मदतीने त्या शब्दातील अक्षरांपासून असे नविन शब्द फळ्यावर तयार करून घ्यावेत.

4 सक्षम बनू या

विद्यार्थ्यांना असा एखादा शब्द देऊन त्या शब्दातील अक्षरांपासून नवीन शब्द तयार करण्यास सांगावेत.

4 सराव करू या

अक्षरांचा क्रम पालटून शब्द द्यावा, त्यात कोणता शब्द असेल तो शोधून काढण्यास सांगावे.

उदा. रवादजा दरवाजा

असे विविध शब्द द्यावेत.

4 कल्पक होऊ या

मुलांना स्वतः असे शब्द शोधून त्यातील अक्षरापासून नवीन शब्द तयार करण्यास सांगावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 13

समजून घेऊ या : हवेचे गुणधर्म

संदर्भ : इ.3री, पाठ ॥ आपली हवेची गरज

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.

•लक्षात घेऊ या :

कृती कर: एक फुगा घे. तो फुगा फुगव.

काय घडले फुगा…………….झाला. (मोठा/लहान)

फुग्यात तू काय भरलेस ?

हवेचे गुणधर्म :

1. हवा सर्वत्र असते.

2. हवा डोळयांना दिसत नाही.

3. हवेला रंग, वास आणि चव नसते.

4. सजीवांना श्वासोच्छ्वासासाठी हवेची गरज असते. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून आपल्याला हवेची गरज असते. हवेमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. शरीराचे कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो. माणसांप्रमाणे इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते.

सराव करू या :

1. आपल्याला हवेची गरज का असते ?

2. कृती कर. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही,

एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घे. वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घे. त्याची वीतभर

लांबीची बारीक सुरळी कर. या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडव. दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मार.

मला काय आढळले ?

पेल्यातील पाण्यात …………….येतील.

यावरून मला काय उलगडले ?

फुंकरीतून……………. पाण्यात शिरली. ती …………….रूपाने बाहेर पडली.

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात –

१. कुटुंबातील व्यक्तींच्या भावना ओळखा. 

२. कुटुंब वृक्ष तयार करा.

३. घराची सजावट करा

आवश्यक साहित्य –

कुटुंब वृक्ष

अध्ययन अनुभव –

आपल्या कुटुंबात खूप वडीलधारी व्यक्ती राहतात त्याविषयी आपण संवेदना दाखवत असतो

१. आपले घर नीटनेटके ठेवा.

उत्तर : – ……………………………………..

२. घराची सजावट करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात याची यादी करा.. 

उत्तर : – ……………………………………..

३. कुटुंबात कोण कोणते सण साजरे केले जातात त्यांची यादी करा

उत्तर : – ……………………………………..

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. घर सजावट कशी करतात ?

उत्तर : – ……………………………………..

२. घटा घरातील कोणत्या व्यक्तीला जास्त मोठेपणा प्राप्त होत असतो?

उत्तर : – ……………………………………..

३. घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणा साठी कोणती कामे करावी लागतात याची यादी करा?

उत्तर : – ……………………………………..