पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती :- १) विविध प्रकारचा मजकूर (उदा वर्तमानपत्र, बालसाहित्य सूचनाफलक ) समजपूर्वक अचन करून त्यावर आधारित प्रश्न विचारतात, मत व्यक्त करतात,

शिक्षक, मित्र यांच्याबरोबर चर्चा करतात.

२) वाचलेला मजकूर आणि दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून त्यातून निर्माण झालेल्या | संवेदना आणि विचार तोंडी/लेखी स्वरुपात व्यक्त करतात.

+ जाणून घेऊ या

उदाहरणादाखल दिलेला विनोद शिक्षकांनी मुलांकडून वाचून घ्यावा व त्याचे आकलन होते किंवा नाही याचा पडताळा घ्यावा. त्यावर मुलांबरोबर चर्चा करावी. ( विनोद वाचताना कदाचित, केवळ साध्या उताऱ्या प्रमाणे मुले वाचन करतील. त्यावेळी शिक्षकांनी योग्य ते बदल सुचवावे.)

१. विनोदामध्ये दोन किंवा जास्त व्यक्ती असू शकतात.

२. विनोदामध्ये एक आशय दडलेला असतो, ज्यामुळे विनोदबुद्धी जागृत होते.

३.विनोदाचे योग्य पद्धतीने वाचन केले तरच त्यातून विनोदनिर्मिती होते.

+ सराव करूया

१. आपल्या वर्गातल्या मुलांसाठी त्यांचे वय व आकलनास योग्य अशा विनोदांची निवड करावी.

२. विविध प्रकारच्या विनोदांचे मुलांना प्रकट वाचन करण्यास सांगावे व विनोदनिर्मितीस वाव द्यावा.

३. मुलांमध्ये विनोदबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करावा.

४. एखाद्या विनोदाचे नाट्यी करण करून घ्यावे.

+ कल्पक होऊया

वर्तमान पत्राती विनोदांचा संग्रह करण्यास प्रोत्साहन द्यावे.

> घरी, शाळेत किंवा मित्रांसोबत निर्माण झालेला विनोद वर्गात सांगा.

( इथे मुलांना विनोद तयार होण्याच्या दृष्टीने विशिष्ट विचार करण्यास प्रोत्साहन मिळावे असे अपेक्षित आहे.)

 विषय –  गणित 

करून बघ.

१ ते ९ अंकातून कोणतेही ३ अंक निवडून लहानात लहान एक संख्या व मोठ्यात मोठी एक संख्या तयार कर. तसेच तुझ्या आवडीची एक तीन अंकी संख्या तयार कर. तयार झालेल्या तिन्ही संख्यांची बेरीज कर.

 विषय –  इंग्रजी 

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

Sing songs, Recite poem in English with intonation

Listen attentively for various purpose

Recite their own favourite poem and song

3. Learning Activity/Experience:

Repeat lines and enact.

I] Hop like a rabbit.

2] Jump like a frog.

3] Fly like a bird.

4] Run like a dog.

5] Walk like a duck.

Practice:

Complete the following lines.

1] Hop like a ………….

2] Jump like a ——

3] Walk like a ——-

4] Run like a ——-

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Listen and enact

1] Sing like a cuckoo.

2] Jump like a monkey.

3] Wake up like an owl

4] Sway like a tree.

5] Eat like a squirrel.

6] Work like an ant.

7] Roar like a lion..

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 07

समजून घेऊया : पाण्याचे उपयोग.

संदर्भ : पाठ 8 आपली पाण्याची गरज

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाचे वर्णन करू शकतो.

लक्षात घेऊ या :

1. सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. सजीवांच्या शरीरात पाणी असते. त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते. अश्रु, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थामध्ये पाणी असते. वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात.

2. पिण्यासोबतच आपल्याला विविध कारणांसाठी पाण्याची गरज असते. खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व आपल्याला कशाप्रकारे पाण्याचा उपयोग होतो ते समजून घ्या.

3. वनस्पतींची पाण्याची गरज शेतकरी शेतात पिकांना पाणी देतात, आपण घरी कुंड्यामधील रोपांना पाणी देतो. पाणी दिले नाही तर रोपे जगतील का? म्हणजेच प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते. जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते, त्यांना पाणी कोण देत असेल? या वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर जाऊन जमिनीतील पाणी शोषून घेतात. काही वनस्पती या केवळ पाण्यातच उगवतात. पाणकणीस, कमळ, शिंगाडा, जलपर्णी या पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत.

सराव करूया :

1. आपण पाणी का पितो ?

………………………………………………..

2. पाण्याचे उपयोग लिहा.

………………………………………………..

3. पाण्याचा वापर काटकसरीने का करावा ?

………………………………………………..

4. वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते?

………………………………………………..

5. केवळ पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे लिहा व त्यांची चित्रे काढा.

………………………………………………..

6. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय करता?

………………………………………………..

विषय – परिसर अभ्यास भाग 

अध्ययन अनुभव –

१. आपले घर गावाच्या कोणत्या बाजूला आहे ते पहा

…………………………………………..

२. नकाशात काही सूची दिलेले आहेत का ते पाहून त्यांचे अर्थ शिक्षकांकडून समजून घ्या 

………………………………………….

३. आपला जिल्हा भारताच्या नकाशात शोधा

………………………………………….

४. नकाशात पाणी कोणत्या रंगाने दाखवले जाते ते पहा काय समजले? – 

वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. मुख्य दिशा सांगा?

………………………………………….

२. उपदिशा सांगा.

………………………………………….

३. आपले राज्य शोधा व त्याला रंग द्या?

………………………………………….