पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पाचवा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
प्रश्न
उत्तर:- ……………………………………………………………………
मुलाच्या मनातून फळ्यावर आलेले शब्द घेऊन मुलांकडून खालीलप्रकारे कृती करून घ्याव्यात.
उदा. एखादे अक्षर मुलांना देऊन त्या अक्षराने सुरु होणारे / अक्षराचा समावेश असलेले शब्द
फळ्यावरील शब्दामधून शोधून वहीत लिहिण्यास सांगावेत. उदा. फळ्यावर ‘स’ या अक्षराने सुरुवात होणारे शब्द शोधून वहीत लिहा.
वेलांटी / उकार / मात्रा असलेले शब्द शोधून वहीत लिहा.
जोडाक्षरयुक्त शब्द शोधून लिहा.
4 सराव करू या
वरील शब्द घेऊन मुलांना विविध वाक्ये तयार करण्यास सांगावीत.
उदा. १) माहिती देणारी वाक्ये तयार करा
२) प्रश्नसूचक वाक्ये तयार करा ।>
4 कल्पक होऊ या
अक्षर पुनरुक्ती करून मजेदार व लयदार वाक्ये मुलांना तयार करण्यास सांगाबित, तयार झालेली वाक्ये भिंतीवर वा कल्पफलकावर लावावीत.
उदा. काळा कावळा काव काव करतो.
विषय – गणित
पुढील उदाहरणे सोडव.
१. स्वराकडे परीपेक्षा ४५ मणी अधिक आहेत, जर परीकडे ९९ मणी असतील, तर दोघींकडील एकूण मणी किती?
२. रमाजवळ ३९७ गोट्या आहेत, यशजवळ १७८ गोट्या आहेत तर दोघांजवळ मिळून किती गोट्या आहेत?
३. राधाकडील गाईंची संख्या हरीपेक्षा ९ ने जास्त आहे, राधाकडे २७ गायी आहेत. दोघांच्या मिळून एकूण गायी किती?
४. संजनाने दुकानातून ११४ रु. ची साखर, २३८ रु. चे शेंगदाणे खरेदी केले. तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली?
५. अहमदने रत्नागिरीला जाण्यासाठी नागपूरहून कोल्हापूरपर्यंत रेल्वेने १०७२ किमी आणि कोल्हापूरहून रत्नागिरीपर्यंत बसने १३९ किमी प्रवास केला तर अहमदने एकूण किती किमी प्रवास केला?
करून बघ
मी क्रीडांगणावर खेळायला गेलो तेव्हा तेथे क्रिकेटचे १०१ खेळाडू होते. ११२ खेळाडू हॉकीचे होते व कबड्डीचे ४० खेळाडू होते. तर मैदानावर एकूण किती खेळाडू होते ?
विषय – इंग्रजी
Practice: Yesterday was
Today is ——–
Tomorrow will
Extension Activity:
Observe the calendar page of March 22 at your home and answer the following questions.
How many times can you see Sunday?
How many times can you see Sunday?
What day is it on 25th?
Parallel Activity/ Reinforcement: –
Fill in the blanks.
Sunday,…………….Tuesday,…………………………
विषय -परिसर अभ्यास भाग 1
सराव करूया :
1. मासा व सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे?
2. मेंढ्या कशासाठी पाळतात?
3. पक्ष्यांना किती पाय असतात?
4. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल?
विषय – परिसर अभ्यास
सांगा पाहू !
१. तुमच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आहे?
२. घरापसुन शाळेपर्यंत जाताना कोणत्या गोष्टी रस्त्याने लागतात?
सांगा पाहू !
१. मानवनिर्मित बाबींसाठी लागणारी साधने कोठून मिळतात?
या प्रश्नाची उत्तरे शोधू !
१. झाडाचे उपयोग सांगा ?
२. घर तयार करण्यासाठी कशाकशाचा वापर करतात?
मला अधिक सराव करायला आवडेल
१. झाडाचे चित्र काढ व झाडाचे वेगवेगळे भाग दाखव?