♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी  – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या..

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही परिचित असलेल्याम्हणी व वाक्प्रचार सांगावेत व

त्यांचे अर्थ सांगण्यास प्रेरित करावे.

जसे – काखेत कळसा गावाला वळसा – जवळच असलेली वस्तू इतरत्र शोधणे. रक्ताचे पाणी करणे खूप मेहनत करणे

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वातून त्यांनी ऐकलेल्या, वाचलेल्या म्हणी व वाक्प्रचार वर्गात सादर करण्यास प्रेरित करावे.

+ सक्षम बनू या..

शिक्षकांनी म्हणी व वाक्प्रचार यांचा मराठी भाषेतील उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

शिक्षकांनी विविध उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडून योग्य म्हणीचा वापर करण्यास प्रेरित करावे.

उदा. प्र. शेतकरी शेतात खूप मेहनत करतात. उ. शेतकरी शेतात रक्ताचे पाणी करतात.

* सराव करू या.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करून म्हणी व वाक्प्रचार यांचे अर्थ जुळवण्याचा खेळ घ्यावा.

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म्हणी व वाक्प्रचार देऊन त्यांचे वाक्यांत उपयोग करण्यास प्रेरणा द्यावी.

जसे -धडकी भरणे – खूप घाबरणे, सापाला पाहून अमितला धडकी भरली. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा, सुरेश म्हणजे उंटावरचा शहाणा. वर्गात चर्चा झालेले, शिक्षकांनी दिलेले तसेच विद्यार्थ्यांना परिचित असलेले पाच वाक्प्रचार व पाच म्हणी लिहा.

+ कल्पक होऊ या..

म्हणी व वाक्प्रचार वापरून आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर / कथेवर किमान १० ओळी लिहिण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 14

समजून घेऊ या: अन्नाची गरज

संदर्भ : इ. 3री, पाठ 12 आपली अन्नाची गरज

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.

सराव करू या :

1. आपल्या शरीराला अन्नाची गरज का असते?

2. आपण पुरेसे अन्न घेतले नाही तर काय होईल ?

3. माणूस कोणकोणते अन्न खातो ?

4. आजारी माणसाला कोणकोणते अन्न पदार्थ खायला देतात ?

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात

१. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची यादी करा. 

२. कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव लिहा

3. कुटूंबातील व्यक्तींच्या चांगल्या सवयी सांगा

आवश्यक साहित्य

कुटुंबवृक्ष

अध्ययन अनुभव –

आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात.

१. कुटुंबातील मोठया व्यक्तींचा आदर करा

२. कुटुंबातील प्रत्येक आजारी व्यक्तींची काळजी घ्या.

३. लहान मुलांचा सांभाळ करा

४. चांगल्या सवयी अंगी बाळगा.

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1. कुटुंबातील व्यक्तींचे चांगले गुण कोणते?

2. मोठ्या कुटुंबात राहण्याचे फायदे कोणते आहेत ?

3. कोणत्या प्रसंगी कुटुंबातील सगळे नातेवाईक एकत्र येतात ?