♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या :

फळयावर ज्याला हा शब्द लिहून तो मुलांना वाचायला सांगावा. मुलांनी जयाला असे वाचल्यास आपण वाचून दाखवावे. वाचलेला कोणता उच्चार बरोबर वाटतो? (ज्याला की जयाला) हे विचारावे. मुलांनी ज्याला हा उच्चार बरोबर आहे असे सांगितल्यानंतर ज्याला या शब्दातील ज्या मध्ये सुरूवातीला कोणता आवाज ऐकू येतो ? (ज की या?) आपणाला ज हा आवाज पूर्ण ऐकू येतो की अर्धा ? असे प्रश्न विचारून चर्चा करावी. सुरूवातीला ऐकू येणारा ज हा आवाज आपणाला अर्धा ऐकू येतो म्हणून तो अर्धा लिहतात हे लक्षात आणून द्यावे.

> सक्षम होऊ या :

 विषय –  गणित 

सोडवून पाहू….

१) रोहनने १२ पुस्तके वाचली व सागरने २२ पुस्तके वाचली. तर सागरने रोहनपेक्षा किती जास्त पुस्तके वाचली ?

२) सीमाकडे १७ फुले आहेत. तर शामलकडे ११ फुले आहेत. शामलकडे सीमापेक्षा किती कमी फुले

आहेत ?

३) प्रकाशने एका परीक्षेत ३२ गुण मिळवले आणि तेवढेच गुण जयदीपने मिळवले, तर कोणी जास्त गुण

मिळवले ?

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : १४ प्राणी व त्यांचे उपयोग

समजून घेऊ या : प्राणी, पाळीव प्राणी, त्यांचे उपयोग.

संदर्भ : शेतीपूरक व्यवसाय (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.५९) अध्ययन निष्पत्ती : १) विविध पाळीव प्राणी व पक्षी ओळखतो व त्यांचे उपयोग सांगता येतात. २) चित्राद्वारे प्राणी व पक्षी यांचे अवयव सांगता येतात.

प्रश्न २) उत्तरे लिहा.

1 आकाशात उडणाऱ्या पक्षांची नावे

२) पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे

३) सरपटणारे प्राणी

४) पक्ष्यांना किती पाय असतात?

५) बकरी काय खाते?

६) शिंगे असणाऱ्या प्राण्यांची नावे

प्रश्न ३) जोड्या लावा.