पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या :

मुलांना एकच अक्षर दोनदा येऊन तयार होणाऱ्या जोडाक्षरांचे शब्द शोधायला सांगावेत व त्याची यादी फळयावर लिहावी

उदा- गटटा, पटटा, लठठ, सुटटी, चडडी.

• र च्या खुणा असलेले शब्द फळयावर लिहावेत व त्यामध्ये र च्या खुणा कुठे आहेत ते शोधून खुणेभोवती गोल करायला सांगावे.

• उदा- प्रकाश, सूर्य, ग्रह, बऱ्याच, पुऱ्या, ट्रक, ट्रेन..

• या शब्दांचे प्रकारानुसार चार गटात वर्गीकरण करण्यास सांगतील

 विषय –  गणित 

आ) ५२ च्या पुढे एक उडी मारली तर ..वर जाशील आणि ५२ च्या मागे एक उडी

मारली तर……………वर जाशील.

इ) ४४ च्या पुढे एक उडी मारली तर. ………………….वर जाशील आणि ४४ च्या मागे एक उडी

मारली तर …………वर जाशील.

सोडवून पाहू…

१. सावीचा रांगेत ३२ वा क्रमांक आहेतिच्या पुढे लगत ओवी उभी आहे तर ओवीचा रांगेतील

क्रमांक किती ?

२. रस्त्याच्या कडेने लावलेल्या ४८ व्या झाडाच्या लगतच्या मागच्या झाडाचा क्रमांक किती?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : १६

माहिती व संप्रेषण साधने

समजून घेऊ या : माहिती व संप्रेषण साधने, संगणकाचे भाग.

संदर्भ : तंत्रज्ञान क्षेत्र (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करु, शिकू या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.६०) आणि संगणकाच्या करामती (इयत्ता दुसरीचा भाषा विषयाचा पाठ) अध्ययन निष्पत्ती : संगणकाचे विविध भाग ओळखून बाह्य भागांची हाताळणी करतो.

सराव करू या:

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) टेलिफोनचे कोणकोणते फायदे आहेत?

(२) वर्तमानपत्रामुळे कोणती माहिती मिळते?

३) संगणकाचा वापर कोठे केला जातो ?

४) पूर्वी निरोप कसे पोचवले जात असत ?

प्रश्न २) हे करा.

१) एका पोस्टकार्डावर मजकूर लिहा व ते तुमच्या बातलगाला पाठवा.

२) तुमचा घरचा पत्ता व्यवस्थित लिहा व तो आईला दाखवा.

प्रश्न ३) कोण ते लिहा. 

१) अधिक वेगाने काम करणारे यंत्र  ……………

२) गाणे ऐकवतो. ……………

३) टाईप करतो.  ……………

४) माहिती साठवतो.  ……………

५) चित्र दाखवतो.  ……………

उपक्रम :

१) संगणकाचे चित्र काढा व रंगवा.

(२) संगणकाविषयी अधिक माहिती मिळवा.