♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती:- शाळेबाहेर आणि शाळेत

वाचन

( वाचनालय/कोपरा

आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचण्याचा प्रयत्न करतात. (इयत्ता

री)

जाणून घेऊ या.

● चित्र मजकूर असलेल्या मजकूरातील चित्रे कोणती आहेत? ते मुलांना विचारावे.चित्रनामे त्यांचे वचन याबाबत चर्चा घडवून आणावी.

> सक्षम बनू या.

मजकूर वाचत असताना चित्राच्या जागी कोणता शब्द घालता येईल यावर वर्गात चर्चा घडवून आणावी. चित्राऐवजी शब्द वापरून सर्व मुलांना एक- एक वाक्य वाचायला सांगावे. गरजेनुसार मदत करावी. मुलांकडून पूर्ण मजकूराचे वाचन करून घ्यावे. शेवटी शिक्षकांनी मजकूराचे प्रकट वाचन करावे. मजकूर समजला आहे की नाही हे तपासण्यासाठी काही सूचक प्रश्न विचारून त्यावर चर्चा करावी.

सराव करू या.- सरावासाठी असे मजकूर तयार करून मुलांकडून वाचनाचा सराव घ्यावा.

> कल्पक हो या – छोटासा मजकूर देऊन मजकुरात चित्रांचा वापर करून अशाप्रकारचा चित्र मजकूर गटात तयार करण्यास सांगावे.

 विषय –  गणित 

थोडे आठवूया

१२+०=

• या उदाहरणात पाटीवर १२ ही संख्या दशक व एकक रुपात १ दशक दांडा व २ सुटे घेवून तयार करा. यामध्ये दुस-या पाटीवर • लिहा.

● म्हणजे किती ? (काहीच नाही )

• बरोबर मग पाटीवर • म्हणजे कोणत्या वस्तू ठेवायच्या ? (कोणत्याच नाही)

• छान मग सांगा. १२ मध्ये काहीच नाही मिळवले तर कोणती संख्या मिळेल?

• (१२ हीच संख्या मिळेल.)

• बरोबर… याचाच अर्थ एखाद्या संख्येत • मिळवले तर संख्येत काहीच बदल होत नाही.

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : ११ परिसरातील फळे

समजून घेऊ या फळांची चव आणि रंग.

संदर्भ : इयत्ता दुसरी १.३. फळप्रक्रिया (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ. क्र. ४७, ४८) अध्ययन निष्पत्तीः अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो.

सराव करू या :

प्रश्न १) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 १) तुम्हाला माहीत असलेल्या फळांची यादी करा.

उत्तर – ……………………..

२) तुमचे आवडते फळ कोणते आहे ?

उत्तर – ……………………..

३) कोणत्याही एका फळाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरा.

उत्तर – ……………………..

प्रश्न २) नावे लिहा.

१) एक बी असणारे फळे ……………………..

२) अधिक बिया असणारे फळे ……………………..

३) बिया नसणारे फळे ……………………..

४) बाहेरून लाल रंगाचे फळे ……………………..

५) चवीला आंबट असणारे फळे ……………………..

६) चवीला गोड असणारे फळे ……………………..