पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या.

१) प्रथम फळ्यावर कपाट हा शब्द लिहा.

२) कपाट हा शब्द तोडून म्हणा व फळ्यावर लिहा.

जसे- क-पा-ट

(३) परत क-पा-ट हा शब्द सावकाश तोडून वाचून दाखवा. मुलांना काळजीपूर्वक ऐकायला सांगा.

नंतर खालील प्रश्न विचारा.

१) सुरुवातीचा आवाज कोणता ते सांग?

२) मधला आवाज कोणता सांग?

३) शेवटी येणारा आवाज कोणता ते सांग? असे प्रश्न विचारून शब्दातील आवाज लक्षात आणून द्या.

= सक्षम होऊ या.

१) प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट ध्वनी असतो ही जाणीव मुलांना करून द्या.

२) प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट आकार असतो हे सांगा

* चला सराव करू या

1. तीन अक्षरी शब्दांवर वरीलप्रमाणे फळ्यावर सराव घ्या.

कल्पक बनू या

१) भाषा साहित्य पेटीतील चित्रे पहा. त्यातील शब्द पाहून पहिला, शेवटचा ध्वनी ऐकून सांगा. 

2) आणखी तीन अक्षरी शब्द मुलांना विचारा आणि आता मुलांकडून तोंडी वरीलप्रमाणे भरपूर सराव घ्या.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day: 9

Learning Outcomes / Competency Statements:

01.17.03: Differentiate between small and capital letters.

Learning Activity: Trace the capital and small letter “B”

Practice: Letter Hunt

Ask the students to colour capital letters.