पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम बनू या..
वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधून विद्यार्थी स्वतःची उपस्थिती नोंदवतील. विद्यार्थी टिक मार्क किंवा गिरगिट करणे, यासारख्या कृती करतील तर ती त्यांना करू देणे. अशा प्रकारच्या कृतीतून लिहिण्यासाठी काही तरी हेतू असतो, हे मुलांना समजेल उपस्थितीपत्रक ही कृती रोज करायची सवय हळूहळू मुलांना लावणे. स्वतःचे नाव ओळखता येईल. निरीक्षण शक्ती वाढेल.
+ चला सराव करूया :
नियमितपणे मुले वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर दररोज स्वतःचे नाव शोधण्याचा सराव करतील. विद्यार्थी स्वतःची दैनिक उपस्थिती नोंदवतील.
• कल्पक होऊया (आव्हाने):
काही मुले वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या आपल्या नावातील अक्षरापासून शब्द सांगतील.